Balasaheb Thackeray Death Anniversary: बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी देवेंद्र फडणवीस यांनी खास व्हिडीओ च्या माध्यमातून वाहिली श्रद्धांजली (Watch Video)
Devendra Fadnavis Pays Tribute To Balasaheb (Photo Credits: PTI)

शिवसेनाप्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या 7व्या स्मृतिदिनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांनी खास व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना अभिवादन केले आहे. या  व्हिडिओ मध्ये फडणवीस यांनी "बाळासाहेब हे सर्वांसाठी प्रेरणादायी आणि स्फूर्तिदायक असे व्यक्तिमत्व होते, महाराष्ट्राचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक वैभव म्ह्णून त्यांच्याकडे पाहता येईल. ऊर्जेचा एक स्रोत म्ह्णून ओळखले जाणारे बाळासाहेब आपल्या एका वाक्याने छोट्यातील छोट्या व्यक्तीला सुद्धा प्रेरणा देऊन जायचे, असे म्हणत बाळासाहेबांच्या प्रतीची भावना व्यक्त केली तर, बाळासाहेबांनी आपणा सर्वांना स्वाभिमानाचा मूलमंत्र दिला आणि तो आपण जपलाच पाहिजे असेही फडणवीस यांनी म्हंटले आहे. शिवसेना (Shivsena) आणि भाजपा (BJP) युतीला तडा गेल्यावरही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये असणारी समानता फडणवीस यांनी या व्हिडिओच्या रूपात शेअर केली आहे.

मागील काही काळात महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु असणाऱ्या उलथापालथीमुळे शिवसेनेने आपल्या विचारसरणीच्या विरुद्ध असणाऱ्या काँग्रेस पक्षाशी हातमिळवणी केली , यावरूनच सेनेला बऱ्याचदा टीकेला देखील सामोरे जावे लागले. देवेंद्र फडणवीस यांनी देखील आजच्या या व्हिडीओ मधून बाळासाहेबांचा स्वाभिमानाचा मंत्र सांगत सेनेला अप्रत्यक्ष इशारा केला आहे.Balasaheb Thackeray Death Anniversary: बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत 'या' 7 गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? पहा 'हे' दुर्मिळ फोटो

देवेंद्र फडणवीस ट्विट

फडणवीस यांच्या व्यतिरिक्त भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील ट्विटर च्या माध्यमातून बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली.

चंद्रकांत पाटील ट्विट

दरम्यान, आज शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवसैनिक तसेच राजकीय मंडळी शिवतीर्थावर जाऊन त्यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेणार आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  हजेरी लावणार असल्याचे समजते , सोबतच काँग्रेसचे देखील काही नेते आज शिवतीर्थवर पाहायला मिळू शकतात. मात्र फडणवीस वा भाजपाचे अन्य मंत्री शिवतीर्थवर जाणार असल्याचे कोणतेही संकेत अद्याप समोर आलेले नाहीत.