महाविकासआघाडीच्या (Mahavikasaghadi) नेत्यांमध्ये असणारे वाद आता हळूहळू अधिक स्पष्टपणे समोर येत आहेत. आज तर शिवसेनेचे मुखपत्र सामना मधून काँग्रेसला चक्क जुनी खाट अशी उपमा देऊन हे वाद अगदीच उघड करण्यात आले आहेत. काँग्रेस (Congress) ही जुनी खाट आहे म्हणून कुरकुरतेय पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ही सगळी कुरकुर सांभाळून घेण्याची तयारी करावी अशा आशयाचा अग्रलेख आज सामना मधून छापण्यात आला होता. या अग्रलेखावरून सुरु असणार्या वादात आता काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam)यांनी सुद्धा उडी घेतली आहे. काँग्रेसला जुनी खाट म्हणणाऱ्या शिवसेनेने (Shivsena) त्यांना मिळालेली सत्ता ही काँग्रेस शिवाय मिळणे शक्य नव्हते या वस्तुस्थितीची जाणीव करून देत निरुपम यांनी एक ट्विट केले आहे. सामनाच्या अग्रलेखात आज नेमकं काय म्हंटलंय वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
संजय निरुपम यांनी ट्विट मध्ये लिहिल्यानुसार, शिवसेना ज्या सत्तेच्या जोरावर इतकी मिरवतेय तीच सत्ता काँग्रेसच्या समर्थनाशिवाय मिळणेही शक्य झाले नसते. काँग्रेसचे मंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी वारंवार वेळ मागत आहेत मात्र मुख्यमंत्री साहेब त्यांना सोडून इतर सर्वांना भेटत आहेत, सत्तेच्या मोहापायी आता काँग्रेस अजून किती सहन करणार? असा सवालही निरुपम यांनी केला आहे. 'सामना' मधील अग्रलेखावर कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया- पहा महाविकास आघाडीतील 'बिघाडी' वर काय म्हणाले?
संजय निरुपम ट्विट
कॉंग्रेस को पुरानी खटिया बताने वाली #शिवसेना भूल गई है कि जिस सत्ता पर वह इतरा रही है, वह #कॉंग्रेस के समर्थन के बगैर उसे नसीब नहीं होता।
कॉंग्रेस के मंत्री मुख्यमंत्री से मिलने का टाईम मांग रहे हैं, मुख्यमंत्री उन्हें छोड़कर सबसे मिल रहे हैं।
सत्ता के मोह में कितना झेलना ?
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) June 16, 2020
दरम्यान, 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांची चांगला समन्वय आहे. कोणी नाराज नाही. बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा झालेली आहे असा विश्वास आज सामनाचे संपादक संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. राहिला प्रश्न अग्रलेखाबाबत तर ही सामना अग्रलेख लिखाणाची एक खास अशी स्टाईल आहे. असे बोलून राऊतांनी विषय टाळला.