Vishal Patil: उमेदवारीतून पत्ता कट होताच विशाल पाटील यांचे कार्यकर्ते आक्रमक; सांगली येथील काँग्रेस कार्यालयात तोडफोड

सांगलीत शिवसेनेच्या चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेले विशाल पाटील (Vishal Patil) आणि विश्वजीत कदम हे बंडाच्या पवित्र्यात असल्याच्या चर्चा देखील रंगल्या आहेत. सांगली लोकसभा मतदार संघातून (Sangli Lok Sabha Constituency) विशाल पाटील (Vishal Patil) यांना लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहे. आक्रमक झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिरज काँग्रेस कमिटी बरखास्त करण्याचा ठराव केला. त्यानंतर सांगलीमध्ये देखील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक (Congress Worker Aggressive In Sangli) होत सांगलीतील काँग्रेस भवनच्या इमारतीवरील काँग्रेस शब्द पुसून टाकला. (हेही वाचा -Lok Sabha Election 2024 : राज ठाकरे यांच्या निर्णयामुळे मनसेत नाराजी, अनेक कार्यकर्त्यांचे पक्षांतर; राजीनामासत्र सुरुच)

सांगलीतील काँग्रेस भवनच्या इमारतीवरील काँग्रेस या शब्दाला रंह लावत काँग्रेस शब्द कार्यकर्त्यांनी पुसून टाकला. सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी असं काँग्रेस भवनच्या इमारतीवर उल्लेख होता. संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमका घेत काँग्रेस शब्द पुसून टाकला. दरम्यान मिरज तालुका काँग्रेस कमिटी आजपासून बरखास्त करण्याचा ठराव काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. सांगलीमधील विशाल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडलेल्या मिरज तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

शिवसेनेच्या चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेले विशाल पाटील आणि विश्वजीत कदम हे बंडाच्या पवित्र्यात असल्याच्या चर्चा देखील रंगल्या आहेत. अशामध्ये या मतदार संघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आता काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक होत त्यांनी काँग्रेस कमिटी बरखास्त करण्याचा ठराव केला.