Sangli Crime News: सांगलीतून (Sangali) एक धक्कादायक घटना समोर येत आहे. सांगलीतील संजयनगर झेंडा चौक परिसरात तरुणाच्या डोक्यात गॅस स्टोव्ह घालून त्याची निघृणपणे हत्या (Murder) करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपुर्ण शहर हादरलं आहे. नितीन आनंदराव शिंदे असं या घटनेत मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणात पोलीस या गुन्हेचा तपास करत आहे. या घटनेत पोलिसांना चार आरोपींचा समावेश असल्याचे संशय आहे. या घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलीसांनी आरोपीवर गुन्हे दाखल केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नितीने शिंदे संजयनगर येथील खेराडकर पेट्रोलपंपाजवळील झेंडा चौकात राहत होता. त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आला आहे. कामावरून परल्यानंतर काल रविवारी सायंकाळी घराबाहेर पडला होता. त्यावेळी एका परप्रांतीयाच्या घराजवळ येवून थांबला. त्या चौकात कुठून तरी संशयित आले होते. त्याच्यात काही कारणामुळे भांडण झाले. भांडणानंतर घरी गेला. काही वेळाने दुचाकीवरून चारजण पुन्हा घराजवळ आले. पुन्हा भांडण सुरु केला. वाद इतका टोकाला गेला की, आरोपीने गॅस स्टोव्ह उचलून नितीनच्या डोक्यात घातला. डोक्याला गंभीर लागल्याने नितीन रक्तबंबाळ झाला. तो जमिनीवर कोसळला. आरोपी घटनास्थळावरू फरार झाले.
नितीन बराच वेळ जमिनीवर गंभीर अवस्थेच पडला होता. दरम्यान त्याचा जागीच मृत्यू झाला. हल्ले खोऱ्यानी नितीनला का मारलं याचे मुख्य कारण नेमकं अद्यापही अस्पष्ट आहे. किरकोळ कारणावरून नितीनची हत्या करण्यात आली आहे, असं प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांना स्थानिकांनी या घटनेची माहिती देण्यात आली. घरासमोर एकाची हत्या करण्यात आली या घटनेने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.