देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे येत्या 30 जून पर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याचा निर्णय सरकारकडून घोषित करण्यात आला आहे. परंतु लॉकडाऊन संदर्भात नवी मार्गदर्शक सूचनांची नियमावली सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्यानुसार काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याच दरम्यान आता मुंबई येथून सांगली (Sangli मधील मिरजेत विनापरवानासह येत आणि माहिती लपवल्या प्रकरणी कोरोनाबाधित व्यक्तीसह अन्य चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात तुम्ही राहत असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत? पहा कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी)
राज्य सरकारने नव्या मार्गदर्शक सुचनेत असे म्हटले आहे की, राज्याअंतर्गत प्रवासाला परवानगी नाही आहे. परंतु जिल्हाअंतर्गत परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी जर एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या राज्यात प्रवास करायचा असल्यास त्याकडे ई-पास असणे गरजेचे होते. तर याच घडामोडीत मुंबईतून जवळजवळ हजारोंच्या संख्येने नागरिकांनी गावाला पळ काढल्याचे दिसून आले आहे.(Maharashtra Unlock 1 ला आजपासून सुरुवात, राज्यात काय सुरु काय बंद, येथे पाहा संपूर्ण यादी)
#सांगली जिल्ह्यात मिरजेतील दत्त कॉलनी येथे मुंबईतून विनापरवाना मिरजेत येऊन माहिती लपविल्याबद्दल #करोनाबाधित आणि त्यांचे नातेवाईक अश्या चार जणांवर गुन्हा दाखल.
— AIR News Mumbai, घरीच रहा, सुरक्षित रहा (@airnews_mumbai) May 31, 2020
दरम्यान, महाराष्ट्रात रविवारी 2487 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तसेच 89 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 67,655 वर पोहोचल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. त्याचसोबत राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या मुंबई-पुणे शहरात आढळून येत आहे. रविवारीच मुंबईतील धारावीमध्ये 38 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे धारावीतील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1771 वर पोहोचली आहे.