Maharashtra Unlock 1 ला आजपासून सुरुवात, राज्यात काय सुरु काय बंद, येथे पाहा संपूर्ण यादी
Maharashtra CM Uddhav Thackeray (Photo Credits: ANI)

देशात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढता प्रसार पाहता केंद्र सरकारने लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथिल करून हा लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनेही 30 जूनपर्यंत वाढविण्यात आला. मात्र केंद्र सरकारप्रमाणे सर्वच लॉकडाऊनचे नियम शिथील करण्यात आले नाही. महाराष्ट्र हा रेड झोन मध्ये येत असल्यामुळे राज्यात अनेक गोष्टींवर बंदी कायम ठेवण्यात आली आहे. महाराष्ट्र अनलॉक 1 (Maharashtra Unlock 1) ला आजपासून सुरुवात झाली असून लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात Phase नुसार काही नियम शिथील करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यात 3 जून, 5 जून आणि 8 जून अशा टप्प्यात हे हळूहळू नियम शिथील करण्यात येणार आहे.

असे असले तरीही नागरिकांना रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत बाहेर फिरण्यास मनाई असून संचार बंदी लागू केली जाणार आहे. महाराष्ट्रात 30 जूनपर्यंत विमान, रेल्वे, मेट्रो, आंतरराज्य रस्ते वाहतूक बंद राहणार आहेत. तसेच शैक्षणिक संस्था, हॉटेल्स देखील बंद राहणार आहेत. राज्यात पुढच्या रविवारपासून वृत्तपत्रांचे घरपोच वितरण सुरू होणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्रात काय सुरु आणि काय बंद येथे पाहा यादी

राज्य सरकारने Phase 1 मध्ये शारिरीक व्यायाम करण्यासाठी नागरिकांना सार्वजनिक ठिकाणे, बीच, मैदाने, गार्डन्समध्ये जाण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे नागरिकांना आता सकाळी 5 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत याचा लाभ घेता येणार असल्याचे नव्या मार्गदर्शक तत्वात स्पष्ट केले आहे.

राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 67,655 वर पोहोचली आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाने (State Health Department) माहिती दिली आहे. राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या मुंबई-पुणे शहरात आढळून येत आहे.