महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन 5.0 साठी नवी नियमावली जाहीर केली. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) जनतेला संबोधित केले आहे. यावेळी मुख्यमंत्री महाराष्ट्राला अनलॉक कसे करणार याबाबत माहिती दिली. कोरोनाच्या काळात ठप्प झालेले घरपोच वृत्तपत्रांचे वितरण (Newspaper Delivery) आता सुरु होणार असून येत्या रविवारपासून वाचकांना घरी बसून वृत्तपत्र वाचनाचा आनंद घेता येईल, अशी महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. वृत्तपत्र विक्रेत्यांशी झालेल्या चर्चेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले. महाष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. तसेच कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जाते आहेत.
फेसबुक लाईव्हवरून जनतेशी संवाद साधताना ठाकरे यांनी राज्यातील जनतेला लॉकडाऊनमधून बाहेर काढताना अनेक महत्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकला. त्यात त्यांनी बंद पडलेल्या घरपोच वृत्तपत्र वितरणाचे टाळे सरकार आता उघडत असल्याचे स्पष्ट केले. गेले दोन महिन्यांपासून वृत्तपत्रांचे घरपोच वितरण बंद झाले होते. त्याचा मोठा परिणाम वृत्तपत्र जगतावर झाला होता. लोकांपर्यंत वृत्तपत्र जात नसल्याने जाहिरातींवर मोठ्या मर्यादा आल्या होत्या. एकूणच वृत्तपत्र व्यवसाय धोक्यात आला होता. भविष्यात त्याचे मोठे परिणाम सहन करावे लागणार, असे वाटत असताना वृत्तपत्रांचे येत्या रविवरपासून घरपोच वितरण होणार असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. ‘फक्त वृत्तपत्र घरपोच पोहोचवणाऱ्या मुलांनी आवश्यक काळजी घेतली पाहिजे. सॅनिटायझर जवळ बाळगले पाहिजे’ असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. हे देखील वाचा- मुंबईत एकूण 39 हजार 464 जणांना कोरोनाचा संसर्ग; दिवसभरात 1 हजार 244 रुग्णांची नोंद; तर, 52 जणांचा मृत्यू
कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून ठोस पाऊले उचलली जात आहेत. यातच कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्र सरकारने शनिवारी लॉकडाउन 5.0 ची घोषणा केली होती. दरम्यान, या काळात कोणत्या प्रकारची सूट देण्यात येईल, हे केंद्र सरकार कडून जाहिर करण्यात आले होते. त्यानंतर आज महाराष्ट्र सरकारने लॉकडाउन 5.0 बाबत नियमावली जाहीर केली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला आहे. तसेच या लॉकडाउनमध्ये काय सुरु राहणार? काय बंद राहणार याबाबत त्यांनी चर्चा केली आहे.