सांगली (Sangli) जिल्ह्यात असलेल्या आटपाडी (Atpadi Taluka) तालुक्यातील झरे (Zare) येथे कार विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू तर, एकजण गंभीर जखमी झाला आहे. झरे-पारेकडवाडी (Zare-Parekarwadi Road) रस्त्यावर रवीवारी रात्री 8 च्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, जखमी हरीबा वाघमोडे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हरिबा वाघमोरे हे गाडीची काच फोडून बाहेर आल्याने बचावले आहेत.
मच्छिंद्र पाटील (वय 60 वर्ष), कुंडलीक बरकडे (वय 60 वर्ष), गुंडा डोंबाळे (वय 35 वर्ष), संगीता पाटील (वय 40 वर्ष), शोभा पाटील (वय 38 वर्ष) अशी या अपघाता मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. हे सर्व जण आपल्या नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी गाडीने पारेकरवाडी येथून मायणी येथे निघाले होते. दरम्यान, पारेकरवाडी गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर आल्यानंतर पाटीलवस्ती लवणानजीक असलेल्या विहिरीत कार कोसळी. गाडी सुरु असताना स्टेरिंग लॉक झाल्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि हा अपघात घडल्याचे समजते. कारचालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार थेट विहिरीत कोसळली. विहिर पाण्यानं भरलेली असल्यामुळे गाडीचे दरवाजेही उघडू शकले नाहीत. (हेही वाचा, धक्कादायक! नाशिक मधील बस आणि रिक्षाच्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा 25 वर तर 30 जखमी; बचावकार्य सुरुच)
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत पाणी खूप होते त्यामुळे मदत आणि बचाव कार्यात अडथळा येत होता. अखेर नागरिकांनी जेसीबीच्या मदतीने कार विहीरीबाहेर काढली.