धक्कादायक! नाशिक मधील बस आणि रिक्षाच्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा 25 वर तर 30 जखमी; बचावकार्य सुरुच
बस आणि रिक्षाच्या धडकेत दोन्ही वाहने जवळील विहिरीत पडून 25 जण मृत्यूमुखी पडल्याची माहिती मिळत आहे.
नाशिकच्या कळवण मालेगाव रोडवर एक विचित्र अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. ज्यात बस आणि रिक्षाच्या धडकेत दोन्ही वाहने जवळील विहिरीत पडून 25 जण ठार तर 30 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. न्यूज 18 लोकमतने दिलेल्या माहितीनुसार,बस चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि तितक्या बससमोर आलेल्या रिक्षावर धडक बसली असे सांगण्यात येत आहे. ऍपे रिक्षातील 9 आणि बसमधील 48 प्रवासी अडकले होते. मालेगावहून कळवनकडे जाणारी कळवण आगाराची ही बस होती.
या अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, अद्यापही अनेक जण यात अडकल्याचे सांगण्यात येत आहे. ही दुर्दैवी घटना मंगळवारी देवळा-मालेगाव रस्त्यावरील मेथी फाटय़ानजीक मंगळवारी दुपारी चार च्या सुमारास घडली.
राज्य परिवहन महामंडळाच्या कळवण आगाराची बस आणि रिक्षा यांच्यात टक्कर झाली. त्यानंतर रिक्षापाठोपाठ बसही सुमारे ६० फूट खोल पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळली. रिक्षातील प्रवासी बसखाली दबले गेले. सायंकाळी क्रेनच्या मदतीने बस बाहेर काढण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरा विहिरीतून रिक्षा बाहेर काढण्यात आली. गंभीर जखमींची संख्या मोठी असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मालेगाव: बस आणि रिक्षाच्या धडकेने भीषण अपघात; 5 जण जागीच ठार
जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र त्यांना आवश्यक तो सर्व औषधोपचार देण्याचेही त्यांनी जिल्हाधिकारी यांना सांगितले आहे. बचावकार्य अधिक वेगाने व्हावे यासाठी एनडीआरएफच्या जवानांची मदतही घ्यावी तसेच मृत व जखमींच्या नातेवाईकांना सर्व आवश्यक सहाय्य करावे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, या अपघात अत्यंत दुर्दैवी असून या अपघाताची माहिती महामंडळ स्तरावर घेण्यात येत आहे. जे प्रवासी व कर्मचारी या अपघातात मृत झाले त्यांच्या नातेवाईकांना महामंडळातर्फे दहा लाखांची मदत केली जाणार आहे. तसेच जे प्रवासी जखमी आहेत त्यांच्यावर होणाऱ्या उपचाराचा सर्व खर्च एसटी महामंडळातर्फे करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री, संसदीय कार्य तथा अध्यक्ष एसटी महामंडळ डॉ. अनिल परब यांनी दिली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 29, 2020 09:07 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

