नवी मुंबईचे भाजप (BJP) जिल्हाध्यक्ष संदीप नाईक (Sandeep Naik) यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Elections) तिकीट नाकारल्यानंतर पदाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. वर्षानुवर्षे दिलेल्या पाठिंब्याबद्दल पक्षाचे आभार मानत नाईक यांनी आपला राजीनामा महाराष्ट्र भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठवला. विधानसभा निवणूक 2024 मध्ये ते बेलापूर विधानसभा (Belapur Constituency) मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र, तिकीट न मिळाल्याने ते नाराज होते. त्यांच्या नाराजीची परिणीती शरद पवार यांच्या राष्ट्रवादी प्रवेश करण्यात होण्याची शक्यता आहे. लकरच ते तुतारी निवडणूक चिन्हावर उमेदवारी दाखल करणार असल्याचे समजते. त्यांचे वडील गणेश नाईक (Ganesh Naik) यांना मात्र भाजपने उमदेवारी दिली आहे.
बेलापूर मतदारसंघावर लक्ष
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप नाईक बेलापूर मतदारसंघावर लक्ष ठेवून होते. परंतु, पक्षाने विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांच्या बाजूने आपले वजन टाकले. भाजपने पुन्हा एकदा त्यांनाच उमेदवारी दिली आहे. नाईक यांच्या कुटुंबाचा बेलापूर प्रदेशात लक्षणीय प्रभाव आहे आणि त्यांचे पक्ष सोडणे हा भाजपसाठी मोठा धक्का ठरू शकतो. महाराष्ट्राचे सध्याचे राजकारण पाहता प्रत्येक जागा महत्त्वाची असताना भाजपसाठी हा निर्णय धक्कादायक ठरु शकतो. (हेही वाचा, सूर्य दिसेना, भाजपमध्ये गेला वाटतं? भाजप पक्ष प्रवेशाची सोशल मीडियावर खिल्ली; शहरांमध्येही झळकले बॅनर)
संदीप नाईक राष्ट्रवादीत जाण्याचा विचार करत आहेत का?
पक्षाच्या निर्णयावर नाराज असलेले नाईक शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी (एनसीपी) बोलणी करत आहेत आणि आगामी निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंड्याखाली लढवू शकतात, हे जवळपास आता स्पष्ट झाले आहे. फक्त त्याची औपचारीक घोषणा झाली नाही. नाईक आज त्यांच्या समर्थकांसोबत बैठक घेण्याची अपेक्षा आहे, जिथे ते त्यांच्या निवडणूक लढवण्याच्या निर्णयाची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. दरम्यान, नाईक यांनी भाजप सोडू नये यासाठी पक्ष पातळीवर जोरदार प्रयत्न सुरु असल्याचे समजते. (हेही वाचा, आम्ही फक्त सतरंज्याच अंथरायच्या का? काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षातील आयारामांची वाढती संख्या पाहून, भाजप शिवसेना पक्षनिष्ठांमध्ये अस्वस्थता)
नवी मुंबईतील नाईक कुटुंबाचा प्रभाव
भाजपने संदीप यांचे वडील गणेश नाईक यांना आगामी निवडणुकीत ऐरोली मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार म्हणून निश्चित केले आहे. वडिलांची उमेदवारी पक्षाकडून जाहीर झाल्यानंतर, संदीप नाईक यांचा राजीनामा आला आहे. नाईक कुटुंब बऱ्याच काळापासून नवी मुंबईतील राजकीय शक्ती आहे आणि संदीपने निष्ठा बदलल्यास या भागातील मतदारांच्या भावनांवर परिणाम होऊ शकतो. ज्याचा भाजपला धक्का बसू शकतो.
भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर
भाजपने आपल्या महायुति आघाडीचा भाग म्हणून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आधीच 99 उमेदवारांची घोषणा केली आहे, ज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारख्या प्रमुख व्यक्तींचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक आणि गतिमान विकासावर भर देणाऱ्या सर्वसमावेशक जाहीरना जाहीर करण्यावर पक्ष सध्या काम करत असल्याचे समजते.
संदीप नाईक यांची मोठी घोषणा
भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष व पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांना पाठवला आहे. भारतीय जनता पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.
-------
I have submitted my resignation from the position of BJP… pic.twitter.com/3FtG2aj5kZ
— Sandeep Naik (@isandeepgnaik) October 22, 2024
समांतरपणे, भाजपने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात योगदान देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी, पत्रकार, डॉक्टर, प्राध्यापक, शिक्षक, अभियंते, व्यावसायिक नेते आणि इतरांसह समाजातील विविध घटकांकडून सूचना मागवल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीशी सुसंगत असलेल्या राज्याच्या विकासासाठी एक मसुदा योजना तयार करण्याचे आणि जागतिक स्तरावर भारताचा विकास दर्शविण्याचे पक्षाचे उद्दिष्ट आहे.