Accident | (Photo Credit: Archived, edited, representative images)

समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात (Samruddhi Mahamarg Accident) सहा जण जागीच ठार तर सहा जण जखमी झाले आहेत. लोकार्पण झाल्यापासून समृद्धी महामार्गावर आतापर्यंत 40 अपघात झाले. त्यापैकी आज झालेला अपघात सर्वात मोठा आहे. मेहकर-सिंदखेड राजा दरम्यान लोणार तालुक्यातील शिवणी पिसा नजीक हा अपघात इर्टिगा गाडी उलटून झाला. अपघातातील बहुतांश मृत आणि जखमी हे छत्रपती संभाजीनंगर शहरातील एन 11 परिसरातील राहणारे रहिवासी असल्याचे समजते. अपघात घडूनही पुढीचे सुमारे एकता सते पाऊण तास कोणतीही मदत अपघातग्रस्तांना मिळाली नाही, असा दावा स्थानिकांनी केला आहे. अपघातग्रस्त इर्टिगा नागपूरकडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने निघाली होती. अपघात घडला तेव्हा इर्टिगामधून 13 लोक प्रवास करत होते.

समृद्धी महामार्गावर घडलेला अपघात रविवारी सकाळच्या सुमारास घडला. भरधाव वेगाने आलेली इर्टिगा गाडी रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकांला अत्यंत वेगाने धडकली. ज्यामुळे ती थेट हवेत उडाली आणि तीन-चार पलट्या मारुन थेट रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन उलटली. एखाद्या सीनेमातील दृश्य वाटावा इतका हा अपघात इतका भयानक होता असे प्रत्यक्षदर्शींनी म्हटले. दरम्यान, अपघातात चार जण जागीच ठार झाले. तर दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. (हेही वाचा, Samruddhi Mahamarg Workers Agitation: समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या 300 मजुरांना मिळाला नाही गेल्या 5 महिन्यांपासून पगार; कामगारांनी सुरु केले आंदोलन)

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात घडल्यानंततर पुढचे सुमारे पाऊण ते एक तास प्रशासनाची कोणतीही मदत पोहोचली नाही. स्थानिकांनी अपघातग्रस्तांना मदत आणि बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर स्थानिकांवरच दमदाटीचा सूर आळवला, असा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. दुसऱ्या बाजूला जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, काहींची प्रकृती अधिकच गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी इतरत्र हालविण्यात आले. मृतांची आणि जखीमींची नावे समजू शकली नाहीत.

समृद्धी महामार्ग प्रकल्प राज्यातील दोन प्रमुख शहरे, मुंबई आणि नागपूर यांना सहा पदरी द्रुतगती मार्गाने जोडतो. या महामार्गाचे काम अद्यापही सुरु आहे. हे जे अंदाजे 701 किमीचे अंतर व्यापणार आहे. दरम्यान, या महामार्गाचा काही टप्पा वाहतूकीसाठी खुला करण्यात आला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हे महाराष्ट्रातील समृद्धी महामार्ग प्रकल्पाचे अधिकृत नाव आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) द्वारे विकसित केला जात आहे आणि या क्षेत्रामध्ये वाहतूक, कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक वाढ सुधारण्याची अपेक्षा आहे.