संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी पुणे येथील आयोजित पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. सामाजिक कार्य करण्यासाठी आपण 'स्वराज्य' संघटनेची (Swarajya Organization) स्थापना करत असल्याची घोषणा त्यांनी केली. आगामी काळात ही संघटना एक राजकीय पक्ष म्हणूनही उदयास येऊ शकते. तशी माझी तयारीही आहे, असे सूचक विधान संभाजीराजे छत्रपती यांनी केले. याच वेळी त्यांनी आगामी राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha Elections) अपक्ष लढविण्याची घोषणाही केली आहे. आपण यापुढे कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नाही. मात्र, राज्यसभेसाठी आवश्यक संख्याबळाचे गणीत पाहता सर्वपक्षांनी मला राज्यसभेवर पाठवावे, अशी भूमिकाही त्यांनी व्यक्त केली. आपण राज्यसभा अपक्ष लढणार आहोत. संधी मिळाली तर भविष्यात लोकसभाही लढू शकतो, असे सूतोवचही त्यांनी या वेळी केली. महाराष्ट्रात दोन, तीन लोक असे आहेत राज्याते कोणत्याही मतदारसंघातून लढू शकता, असेही ते या वेळी म्हणाले.
'स्वराज्य' संघटनेच्या माध्यमातून समाजाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला जाईल. स्वराज्य संघटनेसाठी अद्याप कोणताही रंग, चिन्ह ठरवले नाही. त्यासाठी महाराष्ट्रभर दौरे काढून लोकांशी करणार आहे. काही असले तरी हृदयात असलेला केशरी पट्टा तर कोणी काढू शकत नाही. छत्रपती घराण्यांवर असलेले प्रेम मला या आगोदरच पाहायला मिळाले आहे. राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून बहुजन समाजाला जागृत करण्यासाठी या आधीही महाराष्ट्र पिंजून काढला आहे. राज्यातील जनतेने छत्रपती घराण्यावर नितांत प्रेम केले. (हेही वाचा, Sambhajiraje Chhatrapati: छत्रपती संभाजीराजे तीन मे नंतर काय भूमिका घेणार? 'त्या' वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान)
येत्या जुलै महिन्यात होणारी राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार असल्याची संभाजी राजे छत्रपती यांची पुण्यात घोषणा.
समाजहितासाठी " स्वराज्य संघटने" ची स्थापना करणार- @YuvrajSambhaji @DDNewslive @DDNewsHindi #Sambhajiraje #Pune pic.twitter.com/8Eatvtkw4J
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) May 12, 2022
आपण केलेल्या सामाजिक कामामुळे आपल्याला राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून संधी मिळाली. ही संधी मला देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. त्यामुळे मी त्यांचेही आभार माणतो, असेही संभाजी राजे छत्रपती यांनी म्हटले.