Sambhajiraje Chhatrapati | (Photo Credits: Facebook)

खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati ) यांच्या एका वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्कांना उधान आले आहेत. आपली दिशा वेगळी असेल. ही दिशा येत्या तीन मे नंतर स्पष्ट करणार असल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे. संभाजीराजे छत्रपती आगामी काळात काय भूमिका घेणार याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. आता एखादा राजकीय पक्ष काढणार की एखाद्या नव्या संघटनेद्वारे मराठा आरक्षणाचा मुद्दा तापवत राजकीय जनजागृती करणार याबाबत उत्सुकता आहे. त्यांच्या भूमिकेबाबत अद्याप ठोसपणे काहीच पुढे आले नाही त्यामुळे उत्सुकता वाढली आहे.

कोल्हापूर उत्तर मतदारसंघात विधानसभा निवडणुकीसाठी पोटनिवडणुक लागली होती. या निवडणुकीसाठी काल मतदान पार पडले. या वेळी संभाजीराजे छत्रपती बोलत होते. या वेळी त्यांनी सांगितले की, माझी दिशा ठरली आहे. ही दिशा 3 मे नंतरच स्पष्ट होणार आहे. ती दिशा नेमकी काय असेल हे त्या वेळी मी जाहीर करेन. ही भूमिका नक्की वेगळी असेन असेही ते म्हणाले. त्यामुळे संभाजीराजे नेमीक भूमिका तरी काय घेणार याबाबत अनेक चर्चा सुरु आहेत. (हेही वाचा, Maratha Reservation: रायगड येथे आंदोलन करु, खासदार छत्रपती संभाजीराजे यांचा राज्य सरकारला इशारा)

संभाजीराजे छत्रपती हे राज्यसभेवर राष्ट्रपती नियुक्त खासदार आहेत. त्यांच्या खासदारकीचा कार्यकाळ आता संपतो आहे. त्यामुळे आता यापुढे आपली भूमिका काय असेल असेल प्रसारमाध्यमांनी संभाजीराजे यांना विचारले होते. यावर बोलताना त्यांनी 'वेट अँड वॉच' असे म्हणत आगामी 3 मे नंतर मी माझी भूमिका स्पष्ट करेन असे त्यांनी म्हटले.