Salman Khan and Salim Khan | File Photo

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) चे वडील सलीम खान (Salim Khan) यांना आज (19 सप्टेंबर) सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असताना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची घटना समोर आली आहे. सलीम खान यांनी या प्रकारानंतर वांद्रे पोलिस स्टेशन (Bandra Police Station)  मध्ये तक्रार नोंदवली आहे. ही घटना Windemere building समोर घडली आहे. चालून दमल्यानंतर एका बेंचवर सलीम खान बसले असताना स्कूटीवरून एक अज्ञात व्यक्ती आली त्याच्या मागे बुरखा घातलेली मुलगी देखील होती.

स्कूटी चालकाने गाडी वळवली आणि बुरखा घातलेली मुलगी सलीम खान यांच्याकडे गेली. यावेळी तिने गॅंगस्टर लॉरेंस बिष्णॉई चं नाव घेतलं. 'लॉरेंस बिष्णॉईला पाठवू का?' असं ती  म्हणाली. पोलिसांनी या प्रकाराचं सीसीटीव्ही फूटेज तातडीने पाहून आरोपीला ताब्यात घेतलं. बीएनएस अंतर्गत 353(2), 292, 3(5) या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांनी दोघांनाही स्वतःच्या ताब्यात घेतलं आहे.

ETimes शी बोलताना मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने हा प्रकार केवळ खोडसाळपणातून  केला होता. दोघा आरोपींवर यापूर्वी कोणता गुन्हा दाखल नाही. दरम्यान मागील काही महिन्यांपासून सलमान खान ला धमक्या येत आहेत. त्याच्या निवासस्थानाजवळ गोळीबार देखील झाला आहे. सध्या सलमान खानला पोलिसांनी संरक्षण दिले आहे. त्याला वाय दर्जाची सुरक्षा आहे. यासोबतच सलमान सोबत त्याचा अंगरक्षक शेरा देखील असतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झालेल्या प्रकारानंतर  गॅंगस्टर Lawrence Bishnoi चा भाऊ  Anmol Bishnoi, याने या प्रकाराची जबाबदारी घेतली होती. त्याने तशी सोशल मीडीयात पोस्ट केली होती.