Lockdown: लॉकडाउनमुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान; बाजारात ग्राहक नसल्याने आंब्यांच्या विक्रीत घट

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक उपाय योजना राबवल्या जात आहेत. यातच कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता संपूर्ण देशात लॉकडाउन (Lockdown) घोषीत करण्यात आले होते. मात्र, दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने 3 मे रोजी संपणारा लॉकडाऊन आता 17 पर्यंत काय ठेवण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना अत्यावश्यक सेवा वगळता इतर वस्तूंची खरेदी करता येत नाही. याचा फटका मुंबईतील (Mumbai) आंबे व्यापाऱ्यांना (Mango Trader) सहन करावा लागत आहे. महत्वाचे म्हणजे लॉकडाउन असल्यामुळे बाजारात आंबे खरेदी करण्यासाठी ग्राहक नसल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे समजत आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात पुन्हा एकदा लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. देशात सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहे. तर, राज्यात मुंबई आणि पुणे शहर कोरोनाचे मुख्य हॉटस्पॉट ठरले आहेत. यामुळे या दोन्ही शहरातील व्यापाऱ्यांना अर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. लॉकडाउनमुळे बाजारात ग्राहक येत नसल्याने आंब्याची विक्री मंदावली आहे. एवढेच नव्हेतर, गोदामात असलेल्या आंबे खराब होऊ लागली आहे, अशी माहिती आंबा व्यापारी अब्दुल मलिक अन्सारी म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Mumbai Corona Update Today: मुंबईत कोरोना विषाणूचा थैमान; गेल्या 24 तासात 441 नव्या रुग्णांची नोंद तर, 21 जणांचा मृत्यू

एएनआयचे ट्वीट-

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेकजण संकटात सापडले आहेत. दरम्यान, हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांना अधिक अडचणींना सामोरे जावा लागत आहे. केद्र सरकार आणि राज्य सरकारकडून महत्वाची पाऊले जात आहेत. तसेच काही समाजसेवक बेरोजगार लोकांना अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करून हातभार लावण्याचा प्रयत्न करत आहेत.