Sachin Waze Case: सचिन वाझे प्रकरणावरून भाजप नेते किरीट सोमैय्या (Kirit Somaiya) यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. सोमैय्या यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, 'सचिन वाझे टोळीने 2020-2021 मध्ये मध्ये हजारो कोटी रुपये वसूल केले! ते पैसे कुठे गेले? याची चौकशी एनआयए, ईडी, रिझर्व्ह बँक, कंपनीचे रजिस्ट्रार, आयकर यांनी केली पाहिजे. मी यासंदर्भात सर्व विभागांना पत्र लिहिले असून याबाबत चर्चा केली आहे. निधीचे स्रोत, निधीचा प्रवाह, कॅश मनी ट्रेल, लाभार्थी, बिटकॉइनचा वापर, बेनामी व्यवहार, ऑफशोअर व्यवहारांची चौकशी करणे महत्वाचे आहे. महाराष्ट्र पोलिस निलंबित अधिकारी सचिन वाझे अद्याप एनआयएच्या ताब्यात आहेत. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार आणि मनसुख हिरेन खून प्रकरणात सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. यानंतर मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना त्यांच्या पदावरून हटविण्यात आले.
यानंतर परमबीर सिंह यांनी एक पत्र लिहून महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला. यात त्यांनी गृहमंत्र्यांकडून कोट्यावधी रुपये वसूल करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या पत्रानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राज्यातील विरोधी पक्ष गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आहेत. (वाचा - Maharashtra: परमबीर सिंह यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी)
पीटीआयच्या एका वृत्तानुसार, महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मंगळवारी म्हटलं आहे की, निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाजे हे व्यावसायिका मनसुख हिरण यांच्या हत्येतील मुख्य आरोपी असून त्यांना कोठडी मागण्यासाठी एनआयए कोर्टाशी संपर्क साधला जाईल. एटीएसचे प्रमुख जयजित सिंह म्हणाले की, या प्रकरणात आणखी लोकांना अटक केली जाऊ शकते.
#sachinvaje Gang collected hundreds crores by Extortion
I requested NIA, ED, RBI, Company Ministry, Income Tax to investigate Money Trail
सचिन वाझे गॅंगने हजारो करोड़ रूपये वसूल किये, पैसे कहा गए इसकी जाँच एनआयए, ईडी, रिझर्व्ह बँक, कंपनी मंत्रालय, इन्कम टॅक्सने करनी चाहिए pic.twitter.com/FMp3KSbAOz
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) March 24, 2021
दरम्यान, मंगळवारी संध्याकाळी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. दुसरीकडे, राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहसचिव यांची भेट घेऊन महाराष्ट्र पोलिसांच्या बदल्यांशी संबंधित भ्रष्टाचाराच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.