Sachin Vaze | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या ठेवल्याप्रकरणी एनआयए (NIA) तपास करत आहे. या प्रकरणात एक ससीसीटीव्ही (Sachin Vaze Case CCTV Footage) फुटेजही पुढे आले. सीटीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी 'ती' व्यक्ती कोण याबाब उत्सुकता होती. मात्र, आता एनआयएनेच याबाबत माहिती दिली आहे. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze ) हेच असल्याचे एनआयएने म्हटले आहे. तसेच, या व्यक्तीने पीपीई किट घातलं नाही तर ती व्यक्ती कुर्ता पायजमा घालून फिरत होती, असेही आता पुढे आले आहे.

दरम्यान, अँटिलिया बाहेर जिलेटिनच्या कांड्या सापडल्याच्या प्रकरणाचा तपास एनआयए करत आहे. तर मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास एटीएस करत आहे. मुंबई पोलीस दलातील सीआययूचे पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सचिन वाझे निलंबीत झाले आहेत. या प्रकरणामुळे वाझे हे जोरदार चर्चेत आले आहेत.

एनआयए करत असलेल्या प्रकरणाचा तपासा आता बराच पुढे गेला आहे. एनआयएने वाझे यांच्या कार्यालयातही तपासणी केली. कार्यालयाची झाडाझडती घेऊन एक लॅपटॉप जप्त करण्यात आला. या लॅपटॉपमधील डेटा या आधीच जप्त केल्याचे एनआयए तपासात पुढे आले. तपासादरम्यान वाझे यांच्याकडे मोबाईल फोनची मागणी केली असता मोबाईल हरवल्याचे त्यांनी सांगितले. परंतू, वाझे यांच्या वक्तव्यावर एनआयएला विश्वास नाही. वाझे यांनी आपला मोबाईल फेकून दिला असवा असा एनआयएला संशय आहे. (हेही वाचा, Sanjay Raut On Sachin Vaze Case:महाविकासआघाडी सरकार अस्थिर असल्याच्या भ्रमात कोणी राहू नये- संजय राऊत)

दरम्यान, एनआयएने एक मर्सिडिज कारही ताब्यात घेतली आहे. ही कार सचिन वाझे वापरत असल्याचा संशय आहे. या कारमधून रोख रक्कम, नोटा मेजण्याचे मशीन, एक वायर, एक रसायन असलेली बाटली, एक शर्ट-पॅन्ट आदी वस्तू सापडल्याचे समजते.