राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyar) आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे आगोदरच ठरले आहे. त्यामुळे राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेवेर पाठिण्यात येणाऱ्या 12 सदस्यांची महाविकासआघाडी सरकारने सूचवलेली नावे राज्यपाल बाजूला ठेवतील असा गौप्यस्फोट राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केला आहे. मुश्रीफ यांच्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपाच्या फैरी रंगण्याची चिन्हे आहेत.
काय म्हणाले हसन मुश्रीफ?
''आमदार विनय कोरे यांच्या मातोश्रींचे नुकतेच निधन झाले. या वेळी कोरे यांच्याकडे सांत्वनासाठी बरेच लोक गेले होते. या वेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि आमचेही काही लोक होते. तिथे विनय कोरे यांच्याशी बोलताना चंद्करांत पाटील यांनी महाविकासआघाडीरकारने राज्यपाल कोट्यासाठी पाठवलेली 12 नावे राज्यपाल बाजूला ठेवतील असे सांगितले. '' मुश्रीफ यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
दरम्यान, राज्यघटनेच्या पलीकडे जाऊन राज्यपाल काम करत आहेत. खरे तर त्यांनी संविधानाने घालून दिलेल्या अटी, नियम, संकेत यांचे पालन करायला हवे. परंतू, घटनेच्याही पलिकडे जाऊन ते राजकीय निर्णय घेतात, आसाही आरोप मुश्रीफांनी या वेळी केला. (हेही वाचा, Maharashtra MLC Election 2020: मंत्रिमंडळ बैठकीत राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी प्रस्ताव मंजूर पण नावे अद्यापही गुलदस्त्यात)
राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यातील सख्य पाहता निकषाचा मुद्दा उपस्थित होऊ नये यासाठी महाविकासआघाडी जोरदार प्रयत्नशिल आहे. अखेर, सर्व बाजूंनी विचार होऊन काही नावे निश्चित करण्यात आली आहेत. या नावांची यादी असलेला प्रस्ताव राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे आज सुपूर्त केला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, हा प्रस्ताव नेमका कधी पाठवला जाणार याबाबत समजू शकले नाही.