RSS Dussehra Rally 2019: देशात 'मॉब लिंचिंग'च्या नावाने हिंदू धर्माची बदनामी करण्याचे षडयंत्र सुरु आहे- मोहन भागवत
मोहन भागवत | (Photo Credits: IANS)

देशभरात मागील काही दिवसात आपण मॉब लिंचिंगच्या (Mob Lynching) अनेक घटना ऐकल्या असतील, मात्र RSS सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी या सर्व घटना म्हणजे हिंदू संस्कृतीला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचे म्हणत आपले मत मांडले आहे. दसऱ्याच्या (Dussehra) मुहूर्तावर आज (8 ऑक्टोबर) नागपूर (Nagpur) येथे राष्ट्रीय स्वयंसेवा संघाचा (RSS) श्री विजयादशमी मेळावा (Vijayadashmi Melava) सुरु आहे. या कार्यक्रमात भागवत बोलत होते. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात भागवत यांनी केंद्र सरकारची स्तुती करत कलम 370 हटविण्यासाठी कौतुक केले तसेच चांद्रयान 2 मोहिमेचे दाखले देत सरकार धाडसी निर्णयांना पाठिंबा देत असल्याचे देखील म्हंटले आहे मात्र या सर्वात मॉब लिंचिंग वरील भागवत यांचे विधान हे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

मोहन भागवत यांनी भाषणात सांगितल्यानुसार, भारतात लिंचिंग असा काही प्रकार अस्तित्वात नव्हता, हा बाहेरून आलेला शब्द आहे आणि आता तो हिंदूंच्या बदनामी साठी षडयंत्राच्या रूपात वापरला जात आहे . देशात केवळ एकाच समाजाने दुसऱ्या समाजावर अत्याचार केलेत असेच घडत नाही, तर इतर समाजातील लोकही इतर समाजावर अत्याचार करतात त्यामुळे एकाच समाजाला टार्गेट करू नये असा इशारा त्यांनी दिला. तसेच एखाद्या समुदायातील 5-10 लोकांनी कुणावर अत्याचार केले याचा अर्थ संपूर्ण समाजाला जबाबदार धरता येणार नाही, असे प्रसंग घडल्यास संघ त्यांना पाठिंबा देत नाही उलट हे थांबवण्याचाच प्रयत्न केला जातो, असेही भागवत यांनी स्पष्ट केले.

ANI ट्विट

Dussehra 2019: महाराष्ट्रात आज 'या' 3 ठिकाणी दसरा मेळाव्याचे आयोजन; मोहन भागवत, उद्धव ठाकरे आणि अमित शहा काय बोलणार याकडे लक्ष

दरम्यान, भागवत यांनी आपल्या भाषणातून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर सुद्धा टीकास्त्र सोडले ,हिंदूंची संघटना तयार केली म्हणजे मुस्लिमांचा विरोध असे मुळीच होत नाही संघाच्या बदनामीचे प्रयत्न सुरू आहेत आणि अलीकडे इम्रान खानही ते शिकले आहेत असे भागवत यांनी म्हंटले आहे. देशात सध्या आर्थिक मंदी असल्याने त्याबाबत चिंता व्यक्त करत भगवंतानी केंद्र सरकारने गरज असल्यास कठोर निर्णय घ्यावेत असे आवाहन केले.