राष्ट्रीय स्वयंसेवा संघाचा (RSS) श्री विजयादशमी मेळावा (Dussehra Rally) आज सकाळपासून नागपूर (Nagpur) येथे सुरु झाला आहे. यासाठी सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat), केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सकाळीच खास उपस्थिती लावली आहे. प्रतिवर्षीप्रमाणे मुंबईत सुद्धा शिवसेनेचा (Shivsena) दसरा मेळावा पार पडणार आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हे भगवानगडावर आयोजित मेळाव्यातून जनतेला संबोधित करणार आहेत. महाराष्ट्रात अवघ्या दोन आठवड्यात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या मेळाव्यात नेमके काय बोलले जाणार याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.
प्राप्त माहितीनुसार, 2018 च्या दसऱ्या मेळाव्यात राम मंदिर हा विषय संघ व शिवसेना दोघांकडूनही उचलण्यात आला होता, युती होण्याच्या मागे हे एक महत्वाचे कारण ठरल्याचे म्हंटले जाते. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून हिंदुत्व व राम मंदिरावर भर देत त्या आधारे भाजपशी युती होऊ शकते, असे अप्रत्यक्ष संकेत शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात दिले होते. तर नागपूरच्या दसरा मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी राम मंदिरावर भर दिला होता.
RSS विजयादशमी सोहळा ट्विट
Maharashtra: RSS Chief Mohan Bhagwat, Maharashtra CM Devendra Fadnavis, Union Ministers Nitin Gadkari & General (retd.) VK Singh at an event organised by RSS in Nagpur on the occasion of #VijayaDashami. HCL founder Shiv Nadar is the chief guest at the event. pic.twitter.com/52NuwAkTC4
— ANI (@ANI) October 8, 2019
शिवसेना दसरा मेळावा
दुसरीकडे, शिवसेनेचा दसरा मेळावा हा बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाने सुरु झाला होता पक्षाची भूमिका मांडण्यासाठी या माध्यमातून जनतेला संबोधित करत होते हीच परंपरा कायम ठेवत आता उद्धव ठाकरे सुद्धा दसऱ्या मेळाव्यात राजकीय मनोगत मांडतात. सध्या सुरु असणाऱ्या आरे मेट्रोशेड संबंधित वादावरून आज पुन्हा शिवसेना बोलण्याची चिन्हे आहेत.
शिवसेनेच्या पारंपारिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा, वाजत गाजत गुलाल उधळत शिस्तीने या!
स्थळ - शिवतीर्थ, मुंबई
दि. - ८ ऑक्टोबर रोजी सायं. ६ वा.#दसरामेळावा pic.twitter.com/2yHDeQedf6
— ShivSena - शिवसेना (@ShivSena) October 7, 2019
भगवानगड दसरा मेळावा
दरवर्षी याठिकाणी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या पुढाकाराने मेळाव्याचे आयोजन होते यंदा निवडणुकीचे औचित्य साधून शहा देखील या सोहळ्यात भाग घेणार आहेत.
मी येत आहे, तुम्ही येताय ना??
या रे या सारे या.
देश पाहणार भगवान भक्तांचा थाट,
चलो सावरगाव घाट.....!! pic.twitter.com/vL3qJVDdZm
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) October 6, 2019
दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून राज्यभरात प्रचारसभा सुरु होत आहेत, त्यामुळे दसऱ्या मेळाव्याचे निमित्त साधूनच या प्रचाराचा नारळ फोडण्यात येईल. या माध्यमातून भाजप व शिवसेनेची विधानसभेतील रणनीती सुद्धा काही अंशी स्पष्ट होईल.