Uddhav Thackeray Ayodhya Visit: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला RPI करणार विरोध
Uddhav Thackeray (Photo Credit: Facebook)

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजतूप याच्या मृत्यूप्रकरणी सुरु करण्यात आलेल्या कॅम्पेनमध्ये सहभागी असलेली बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिच्या विरोधात मुंबईत करण्यात आलेल्या कारवाईमुळे अयोध्येतील बहुतांश साधुसंतांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला पूर्णपणे विरोध करणार असल्याचे म्हटले आहे. आरपीआय (ए) चे प्रदेशाध्यक्ष पनव भाई गुप्ता यांनी शनिवारी अयोध्येतील साधु-संतांची भेट घेतली. या वेळी संतांनी पालघर मध्ये झालेल्या साधुंच्या हत्येची सीबीआय तपासणी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. यावर त्यांनी साधुंच्या हत्येप्रकरणी सीबीआयच्या तपासणीसाठी संघर्ष करणार असल्याचे म्हटले आहे.

त्यांनी असे म्हटले की, महाराष्ट्रात संतांची हत्या केल्यानंतर सरकार ज्या पद्धतीने वागत आहे ते पूर्णपणे दुर्भाग्य आहे. आम्ही हे प्रकरण रस्त्यावरुन ते संसदेपर्यंत घेऊन जाणार आहोत. याच सोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांच्या विधानावर आरपीआयने निशाणा साधला आहे. पनव भाई गुप्ता यांनी म्हटले की, चंपत राय यांचे विधान हे अयोध्येतील साधु-संताचा अपमान आहे. त्यांचे विधान भगवान श्रीराम जन्मभूमी यांच्या प्रतिष्ठेच्या विरोधातील आहे. अयोध्येतील साधुसंत पूजनीय आहेत. त्यांनी राममंदिराच्या उभारणीसाठी आपले जीवन समर्पित केले आहे. त्यांच्या सम्मानाला ठेच पोहचेल अशी कोणतीच स्थिती खपवून घेणार नाही.(Congress On Kangana Ranaut: कंंगना ड्रग्ज माफियांंची माहिती NCB ला न देता हिमाचल प्रदेशला कशी गेली, सचिन सावंंत यांंचा सवाल)

गुप्ता यांनी असे म्हटले की, बाबा साहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांनी नेहमीच स्री चा सम्मान आणि सशक्तीकरणावर जोर दिला. त्यांनी असे म्हटले की, ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकारने चित्रपटातील अभिनेत्री कंगना रनौत हिच्या विरोधात सूड घेण्याच्या भावनेने कारवाई केली. हे पूर्णपणे दुर्भाग्यपूर्ण आणि निंदनीय आहे. महाराष्ट्र सरकारने स्रीच्या विरोधात जाऊन हे अत्यंत वाईट पाऊल उचलले आहे. मुंबई विमानतळावर आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी पोहचून तिला सुरक्षा दिली.(Champat Rai Support CM Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अडवणारा अजून अयोध्येत जन्माला यायचा आहे- चंपत राय)

गुप्ता यांनी पुढे असे ही म्हटले की, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कंगनाच्या प्रकरणी महाराष्ट्राचे राज्यपाल यांची सुद्धा भेट घेतली होती. त्याचसोबत त्यांच्या नेतृत्वात आरपीआयच्या एक-एक कार्यकर्त्यांनी स्त्रिच्या अस्मितेच्या रक्षणासाठी लढाई लढली आहे. तर कंगना रनौत हिच्या विरोधात मुंबईत करण्यात आलेल्या कारवाई नंतर अयोध्येतील साधुसंतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे तेथे स्वागत केले जाणार नाही असे आव्हान केले आहे. याच्या विरोधात श्रीराम जन्मभूमी तिर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी असे म्हटले की, उद्धव ठाकरे यांना अयोध्येत येण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. चंपत राय हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात उतरले आहेत.