Congress On Kangana Ranaut: कंंगना ड्रग्ज माफियांंची माहिती NCB  ला न देता हिमाचल प्रदेशला कशी गेली,  सचिन सावंंत यांंचा सवाल
Sachin Sawant Comments On Kangana Ranaut (Photo Credits: File Image)

Sachin Sawant Comments On Kangana Ranaut: बॉलिवूड अभिनेत्री कंंगना रनौत (Kangana Ranaut) काही दिवसाच्या मुंंबई दौर्‍यानंंतर आता पुन्हा आपल्या मुळगावी जाण्यासाठी निघाली आहे. काही वेळापुर्वीच तिचे विमान चंदीगढ विमानतळावर उतरले असुन आता पुढे इथुन ती गाडीने मनाली (Manali) ला जाणार आहे. दरम्यान कंगना मुंंबईत येऊन चार दिवसात निघुन गेली पण ज्यासाठी ती आली होती ते काम केलंच नाही असे म्हणत महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीतर्फे (MPCC)  सचिन सावंंत (Sachin Sawant) यांंनी टीका केली आहे. सचिन यांंनी नुकतेच एक ट्विट करत , "कंंगना लगेच हिमाचलला निघुन गेली हे आश्चर्यजनक आहे, तिच्याकडे ड्रग्ज माफिया आणि बॉलिवूड च्या संबंंधाविषयी माहिती होती तर तिने मुंंबईला आल्यावर ही माहिती NCB ला का दिली नाही? अशाप्रकारे माहिती असताना सुद्धा लपवणे हा IPC 202 आणि 176 कलमांच्या अंतर्गत NDPS गुन्हा नाहीये का? की आपल्याकडे माहिती आहे अशी केवळ अफवा कंगना पसरवत होती असे प्रश्न केले आहेत.

कंंगनाने यापुर्वी केलेल्या ट्विट्स मध्ये अनेकदा आपण ड्रग्ज घेणार्‍या बॉलिवूड कलाकारांंची माहिती जाणतो मात्र मुंंबई पोलिस आपला जबाब नोंंदवुन घेत नाहीयेत असे म्हंंटले होते, आता हा तपास NCB कडे असताना कंंगनाने थेट आपल्याकडील माहिती NCB ला का दिली नाही असा सचिन सावंंत यांंच्या ट्विट चे टोक आहे.

सचिन सावंंत ट्विट

दरम्यान, कंंगनाने मुंंबईतुन निघण्याआधी पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकार वर ताशेरे ओढले होते. तुम्ही एका महिलेला घाबरवण्याचा प्रयत्न करताय पण त्यामुळे तुमचीच प्रतिमा धुळीत जात आहे. मागील काही दिवसात तुम्ही माझं घर, ऑफिस तोडुन, मला धमक्या देऊन मी मुंंबईची POK शी केलेली तुलना योग्य असल्याचंच दाखवुन दिलंय अशा आशयाचे ट्विट कंंगनाने केले होते.