RoRo Services From Bhayandar to Vasai: 20 फेब्रुवारी पासून भाईंदर- वसई प्रवासासाठी रो रो सेवा नागरिकांसाठी होणार खुली
A Ro-Ro service in operation. (Photo credits: Wikimedia commons)

भाईंदर, वसईच्या (Bhayandar to Vasai) नागरिकांसाठी एक खूषखबर आहे. या मार्गावर आता 20 फेब्रुवारी रोजी रो रो सेवेची (RoRo Services) ट्रायल सुरु होत आहे. त्यानंतर बुधवार 21 फेब्रुवारीपासून या मार्गावर नियमित फेरी सुरू होत आहे. Mumbai Metropolitan Region मधील ही दुसरी रो रो सेवा आहे. पहिली रोरो रायगड जिल्ह्यात Ferry Wharf ते Mandwa दरम्यान सुरू करण्यात आली आहे. दरम्यान सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, या कोकण किनारपट्टीवरील विविध भागात फेरी सेवेचा समृद्ध अनुभव असलेल्या रत्नागिरीस्थित संस्थेला शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. भाईंदर वसई दरम्यान  खाडी मार्गावर रो-रो प्रवासी जहाजे चालवण्याचीही आता त्यांना परवानगी देखील देण्यात आली आहे.

पहिली सेवा वसई वरून सकाळी 6.45 ला सुरू होणार असून संध्याकाळी 6.45 ला शेवटची सेवा असेल. दिवसभरामध्ये 8 फेर्‍या चालवल्या जाणार आहेत. दुपारी 12.45 ते 2.15 या मध्यान्ह भोजनाच्या वेळी देखील सेवा बंद राहणार आहेत. एका रोरो मध्ये 33 कार्स आणि 100 प्रवासी घेऊन जाण्याची क्षमता आहे.

रोरो सेवेचं तिकीट किती? 

दुचाकीसाठी ₹60, रिक्षाला ₹100 आणि कारसाठी ₹180 शुल्क आकारले जाणार आहे.. प्रौढ प्रवाशाकडून ₹30 आकारले जातील आणि एका लहान मुलासाठी (3-12 वर्ष) प्रत्येक प्रवासासाठी ₹15 प्रमाणे तिकीट आकारले जाईल. ही जहाजे गोव्यात वापरल्या जाणाऱ्या जहाजांसारखी आहेत, परंतु सरकारने नदीच्या जलवाहतुकीवर अनुदान दिले आहे आणि गोव्यात RoRo वर प्रवास विनामूल्य आहे. नक्की वाचा: MSRTC ची मोठी घोषणा; अटल सेतू वरून धावणार मुंबई-पुणे-मुंबई नियमित दोन प्रिमियम शिवनेरी .

फेरी सर्व्हिस मुळे वसई- भाईंदर प्रवासाचा वेळ कमी झाला आहे. त्यामुळे प्रदुषणमुक्त, ट्राफिक विना वेगवान प्रवास करणं शक्य होणार आहे. सध्या मुंबई- अहमदाबाद हायवे मुळे लोकांना मोठ्या ट्राफिक जाम चा अडथळा रोज पार करावा लागत आहे.