
Wardha Crime: वर्धा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील वाघोडी येथे दरोडेखोरांनी रात्री सशस्त्र दरोडा टाकण्यात आला, नारा शिवार येथील एका फार्म हाऊसवर सात ते आठ दरोडेखोरांनी रात्री सशस्त्र दरोडा टाकाला आहे. या घटनेत दरोडे खोरांनी शेतकऱ्यावर चाकूने वार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेत ते गंभीर जखमी झाले आहे. दरोडे खोरांनी फार्म हाऊस येथे सोने आणि तब्बल 55 सोयाबीनची पोती चोरी केली. (हेही वाचा- जोधपूरमध्ये दरोड्यादरम्यान महिलेचा गळा कापला, मुलांवरही प्राणघातक हल्ला)
नागपूर येथील नारायण गोपाल पालिवाल या शेतकऱ्याचे फार्म हाऊस आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सात ते आठ दरोडेखोरांनी शेतकऱ्याला चाकूचा धाक दाखवत दरोडा टाकला. ५५ पोते सोयाबीन, सोन्याचे दागिने लुटून फार्म हाऊसवरील प्रतिकार करणाऱ्या एकाच्या पोटात धारदार शस्त्राने भोसकून गंभीर जखमी केले. आठवड्यातून एकदा ते या फार्महाऊस वर जात असतात, त्यांचे पीक आणि शेतीचे उत्पन्न याच फार्महाऊसवर ठेवलेले असतात. रविवारी देखील नारायण पालिवाल यांच्या मुलगा गोपाल पालिवाल आणि हरिकुमारी पालिवाल हे सर्व जण त्यांच्या फार्म हाऊसवर गेले होते.
मध्यरात्री सात ते आठ दरोडेखोरांनी त्यांच्या फार्म हाऊसवर दरोडा घातला. मध्यरात्री फार्महाऊस वर दरवाजा ठोठावला. दरवाजा उघडताच, पात ते सहा जण चाकूचा धाक दाखवत आत घुसले. त्यांनी सर्वांना मारण्यास सुरुवात केली. झटापटीत दरोडेखोरांनी नारायण यांच्या मुलगा गोपाल यांच्या पोटात चाकू खुपसला. ते गंभीर जखमी झाले. नारायण यांची पत्नी हरिकुमारी पालिवाल यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व कानातील दागिने हिसकावले. तसेच ५५ पोते सोयाबीन चोरी केली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यांनी ही माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी चव्हाण यांना दिली. चव्हाण तातडीने घटनास्थळी पोहोचले. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली.