Road Accident: मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; 3 ठार, एक गंभीर जखमी
Accident Representational image (PC - PTI)

मुंबई- आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra Highway) ट्रक आणि कंटनेर यांच्यात जोरदार धडक (Road Accident) झाल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना आज (3 मार्च) सकाळी 6 वाजताच्या सुमारास घडली आहे. या भीषण अपघात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर, एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर जवळच्या शासकीय रुग्णालयात उपाचार सुरु आहेत. ट्रकचा टायर फुटल्याने हा अपघात घडला आहे, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

नाशिककडून मुंबईच्या दिशेने येत असताना ट्रकचा टायर फुटला. ज्यामुळे ट्रक दुभाजक ओलांडून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरला ट्रकने जोरात धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाल्याचे कळत आहे. हे देखील वाचा- Pune Fire: पुण्यातील बिबवेवाडी परिसरातील एका कारखान्याला भीषण आग

ट्विट-

सकाळने दिलेल्या माहितीनुसार, वीरेंद्रसिंग डुंगरसिंग परिहारं (ट्रक चालक), मोरपाल (ट्रक क्लीनर) जितेंद्र यादव (कंटेनर चालक) या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, कंटेनर क्लीनर अस्लम खान गंभीर जखमी झाला असून जवळच्या शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. ही वाहने क्रेनने बाजुला घेऊन नाशिककेडे जाणारी मार्गिका बंद करण्यात आली. तसेच एका मार्गाने वाहने वळवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.