Road Accident in Nashik: नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रोडवर कार-एसटी बसची जोरदार धडक; तीन ठार
(Photo: IANS)

Road Accident in Nashik: नाशिक येथे राज्य परिवहन मंडळाची बस आणि कारमध्ये झालेल्या अपघातात दोन महिलांसह एक पुरुष ठार (Dead)झाल्याची घटना घडली आहे. त्याशिवाय आपघातात दोन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी (Injured) झाला आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आज मंगळवारी ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रोड(Nandgaon Chhatrapati Sambhajinagar Road)वर गंगाधरी गावाजवळ सकाळी 10.30 च्या सुमारास महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) प्रवासी बस चाळीसगावहून मनमाडकडे जात असताना हा अपघात झाला. (हेही वाचा:Uttar Pradesh Accident: दिल्ली-लखनऊ महामार्गावर दोन वाहनांच्या धडकेत भीषण अपघात; सहा जणांचा मृत्यू(Watch Video) )

त्यावेळी भरधाव वेगात असलेल्या बस चालकाने पुढे असलेल्या एका वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असनाता हा अपघात झाला. त्यामुळो विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारला बस धडकली. हा अपघात इतका भीषण होता की बसचा पुढील भाग आणि कारचा चुराडा झाला. अपघातात कार मधील ३ प्रवाशांचा मृत्यू झाला.

दरम्यान, बसमधील प्रवाशांनी एसटी बस चालकावर निष्काळजीपणे गाडी चालवल्याचा आरोप केला आहे. तसेच अपघाताची चौकशी करण्यासाठी प्रवाशांनी पोलिसांना पाचारण केले आहे. सध्या दोन्ही वाहने रस्त्यावरून बाजूला करण्यात आली आहेत. काही काळ वाहतूक कोंडी झाल्यानंतर वाहतूक व्यवस्था पूर्वपदावर आली आहे. दरम्यान, पोलिसांनी जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.