Accident (PC - File Photo)

Road Accident: मुंबई गोवा महामार्गावर चिंचवण गावाच्या हद्दीत कार नाल्यात कोसळल्याचे भीषण अपघात घडला आहे. या अपघातीत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहे. सोमवरच्या रात्री ही घटना घडली. केळंबा देवीचे दर्शन घेऊन परत येणाऱ्या भाविकांच्या गाडीचा अपघात झाला. कार चालकाचे नियत्रंण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व जण सानपाड येथील रहिवासी आहेत. नवरात्रीत देवीच्या  पेण तालुक्यातील प्रसिध्द खरोशी येथील केळंबा देवीच्या दर्शनासाठी पाच जण कारने गेले होते. देवीचे दर्शन घेवून पाच जण परतीच्या प्रवासाला लागले. रात्रीच्या वेळीस अचानक, कार वरिल नियत्रंण सुटल्याने गाडी थेट नाल्यात कोसळली. मुंबई गोवा महामार्गावर चिंचवण गावाच्या हद्दीत गाडी नाल्यात कोसळली. या अपघातात दोन जणांचा जागीच मरण पावले. जीवन पाटील आणि रमेश पाटील असं या मृत झालेल्या भावांची नावे आहे.

इतर जखमी झालेल्यांची नावे समजू शकली नाही. दुर्दैवी अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतला. पोलिसांनी घटनास्थळी येत जखमींना उपचारासाठी स्थानिकांच्या मदतीनं रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. घटनेबाबत अधिक तपास  पोलिसांनी सुरु केला आहे.अशी माहिती पोलिसांनी दिली.