Tanaji Sawant | (Photo Credits: Facebook)

माजी मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant)  यांचा मुलगा ऋषिकेश सावंत (Rishikesh Sawant) बेपत्ता झाला असून त्याचं अपहरण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पुणे एअरपोर्ट वरून तो बेपत्ता झाल्याचं समोर येत आहे. या प्रकरणी सध्या पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सिंहगड पोलिस स्टेशन मध्ये नर्‍हे भागात संध्याकाळी 4.57 वाजता स्विफ्ट गाडीतून जात असताना त्याचे अपहरण झाले आहे.

मीडीया रिपोर्ट्स नुसार, पुणे पोलिसांच्या कंट्रोल रुमला ऋषिकेशच्या अपहरणाबद्दल निनावी फोन आला आहे. तानाजी सावंतांच्या मुलाचं अपहरण का झालं असावं? याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फूटेज तपासलं जात आहे. पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट गाडीतून तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण करण्यात आल्याची माहिती आहे.

पुण्यात सध्या विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. ऋषिकेशचे फोन कॉल्स तपासले जात आहेत. कात्रज येथील सावंतांंच्या निवासस्थानी देखील पोलिस पोहचले आहेत.