प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

कल्याणमधून (Kalyan) एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे वाहतूक पोलिसांनी (Traffic police) ऑटोचालकाचे (Auto Driver) हेल्मेट न घातल्याने 500 रुपयांचे चालान (Fine) कापले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 3 डिसेंबर 2021 रोजी मुंबईतील कांदिवली (Kandivali) परिसरात एक दुचाकी चालक हेल्मेट (Helmet) न घालता कुठेतरी जात होता. घटनास्थळी उपस्थित वाहतूक पोलिसांनी त्याचा फोटो काढला. मात्र हे चलान ऑटोचालक गरुनाथ चिकनकर यांच्या नावाने आले. चालानमधील फोटो फक्त दुचाकी चालकाचा आहे. मात्र ऑटो क्रमांक, नाव आणि मोबाईल क्रमांक गुरुनाथचा आहे. रिक्षाचालक गुरुनाथ चिकनकर यांना मोबाईलवरून 500 रुपयांचा दंड केल्याचे समजताच त्यांना धक्काच बसला.

यानंतर रिक्षाचालकाने कल्याण वाहतूक पोलिसांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी ठाणे आणि मुंबईला जाण्यास सांगितले. यावर रिक्षाचालक म्हणतो की, माझी चूक नसताना मी काम बंद करून मुंबई-ठाण्याला का फिरू, वाहतूक पोलिसांनी आपली चूक स्वत: सुधारण्याची गरज असल्याचे गुरुनाथ सांगतात. या सर्व समस्यांमध्ये गुरुनाथला मानसिक त्रास झाला आहे. हेही वाचा MSRTC Strike: एसटी महामंडळ महाराष्ट्र सरकारच्या सेवेत विलीन करता येणार नाही, त्रिसदस्यीय समितीच्या अहवालात निष्कर्श

आज तकच्या वृत्तानुसार, रिक्षाचालकाने नोटीस तत्काळ हटवण्याची आणि दंडाची मागणी केली आहे. कल्याणमध्ये नुकतीच ई-चलान प्रणाली सुरू झाली असून, त्यात अनेक त्रुटी समोर येत आहेत. वाहतूक पोलिसांनी ई-चलान प्रणालीवर काम करताना वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांना शिक्षा झाली पाहिजे, असे ऑटोचालकाचे नातेवाईक मदन चिकनकर यांनी म्हटले आहे.