Sinhagad Road Attack: वनराज आंधेकर यांच्या वरील हल्ल्याचं प्रकरण ताजं असतानाच पुन्हा पुण्याच्या सिंहगड रस्त्यावरील (Sinhagad Road) किरकटवाडी (Kirkatwadi) फाट्यावर हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकावर कोयत्याने हल्ला झाल्याचा अजून एक थरारक प्रकार समोर आला आहे. सकाळी 7 च्या सुमारास हा हल्ला झाला आहे. दरम्यान जखमी तरूणाची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या माहिती नुसार हा हल्ला पूर्व वैमनस्यातून झाला आहे.
हल्ल्याचा मास्टर प्लॅन
बदला घेण्याच्या ईर्ष्येमधून सागर चव्हाण या तरूणावर हल्ला झाला आहे. दरम्यान त्याला भेटण्यासाठी आधी आरोपींनी मुलीच्या नावे एक फेक फेसबूक अकाऊंट बनवले होते. या अकाऊंट वर चॅटिंग करत त्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यात आले. त्यानंतर तरूणाला सिंहगड रोड वर एक दिवशी भेटण्याच्या बहाण्याने बोलावण्यात आले. त्याला आल्याचं पाहून कोयत्याने त्याचा हल्ला झाला. या घटनेचं सीसीटीव्ही फूटेज समोर आलं आहे. हा सारा थरारक प्रकार कॅमेर्यामध्ये कैद झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हा हल्ला सुनियोजित कट होता.
मे महिन्यापासून या कटाची सुरूवात आहे. डहाणूकर कॉलनी मध्ये एकमेकांकडे खुन्नस देऊन पाहिल्यानंतर एकावर हल्ला झाला होता. या हल्ल्यात श्रीनिवास वतसलवारचा खून झाला होता. ज्या तरुणांनी श्रीनिवास वर हल्ला केला त्यापैकी एक सागर चव्हाण होता. आता या खूनाचा बदला घेण्याच्या ईर्ष्येने खूनाचा कट आखण्यात आला. Vanraj Andekar Murder: वनराज आंदेकर यांचा खून कौटुंबिक वादातून; बहिणींनीच दिली सुपारी.
पुण्यात कायदा सुव्यवस्था अस्तित्वात राहिलेली नाही. गुन्हेगारांना कसलाही वचक राहिलेला नसून पुणे शहराची वाटचाल 'कल्चरल कॅपिटल' पासून 'क्राईम कॅपिटल'कडे झाली आहे. किरकटवाडी येथे आज सकाळी एका तरुणाला कोयत्याने सपासप वार करुन गंभीर जखमी करण्यात आले. या हिंसक घटना वारंवार घडत असून… pic.twitter.com/BU5knjIF0n
— Supriya Sule (@supriya_sule) September 4, 2024
पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरामध्ये मागील काही दिवसांतली ही चौथी हत्येची घटना आहे. पुण्यामध्ये भर रस्त्यात अशाप्रकारे होत असलेले जीवघेणे हल्ले चिंतेत भर टाकणारे आहेत. 'पुण्यात कायदा सुव्यवस्था अस्तित्वात राहिलेली नाही. गुन्हेगारांना कसलाही वचक राहिलेला नसून पुणे शहराची वाटचाल 'कल्चरल कॅपिटल' पासून 'क्राईम कॅपिटल'कडे झाली आहे. ' अशी पोस्ट X वर सुप्रिया सुळे यांनी केली आहे.