मुंबईत एका नौदलाच्या माजी अधिकाऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र व्हॉट्सअॅपवर शेअर केल्यानंतर त्याला शिवसैनिकांची चोप दिल्याचा प्रकार समोर आला आहे. मदन शर्मा असे त्यांचे नाव असून 8-10 कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरात घुसून त्यांना जबरदस्त मारहणार केल्याचा व्हिडिओ सुद्धा उघडकीस आला आहे. या प्रकरणी आता पोलिसात FIR दाखल करण्यात आल्याची माहिती मदन शर्मा यांची मुलगी शिला शर्मा हिने दिली आहे.
ANI ने दिलेल्या वृत्तानुसार शिला शर्मा हिने असे म्हटले आहे की, वडिलांनी मेसेज फॉरवर्ड केल्याने त्यांना धमक्या देण्यात आल्या. तसेच काही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी घरी येत वडिल त्यांच्यासोबत गेले. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली असल्याचे तिने स्पष्ट केले आहे. सध्या या प्रकरणात शिवसेनेचे कमलेश कदम यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे.
#WATCH My father received threats for forwarding a message. A no. of ppl from Shiv Sena attacked him.Later,police came to our residence & insisted on taking my father with them.We've registered FIR: Sheela Sharma,daughter of former Navy officer who was attacked in Mumbai. (11.09) pic.twitter.com/SolGWw7Nyh
— ANI (@ANI) September 12, 2020
दरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घटना अतिशय दुःखद असल्याचे ट्वीट केले आहे. ते म्हणतात, ‘एक अतिशय दुःखद आणि धक्कादायक घटना आहे. सेवानिवृत्त नेव्हीच्या अधिकाऱ्याने व्हाट्सएपवर संदेश पाठविल्यामुळे गुंडांनी त्यांना मारहाण केली. उद्धव ठाकरे कृपया हा गुंडाराज थांबवा. आम्ही या गुंडांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करतो.’ असे त्यांनी ट्वीट करत म्हटले होते.