Shaniwarwada Elgar Parishad Pune:  एल्गार परिषद भरवण्यासाठी परवानगी द्या; निवृत्त न्यायाधीश बी जी कोळसे पाटील यांची पुणे पोलिसांकडे अर्ज
Elgar Parishad Pune | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Elgar Parishad2021: पुणे (Pune) शहरातील शनिवारवाडा((Shaniwarwada) या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यंदाही एल्गार परिषद (Shaniwarwada Elgar Parishad) भरविण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी निवृत्त न्यायाधीश बी जी कोळसे पाटील (Retired Judge BG Kolse Patil) यांनी केली आहे. कोळसे पाटील यांनी या संदर्भात पुणे पोलिसांकडे अर्जही केला आहे. पुण्यातील स्वारगेट पोलीस स्टेशनकडे परवानगी मागताना गणेश कला क्रीडा रंगमंच पुणे (Ganesh Kala Krida Manch Pune ) या ठिकाणी या कार्यक्रमासाठी परवानगी मिळावी असे कोळसे पाटील यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे.

राज्य आणि देशभरात कोरोना व्हायरस संकटाचे सावट अद्यापही दूर झाले नाही. त्यामुळे लॉकडाऊन शिथिल करुन सार्वजनिक, खासगी कार्यक्रम, सण उत्सव यांना सशर्थ परवानगी दिली असली तरी त्यावर अनेक मर्यादा आहेत. सरकारने नाताळ आणि नववर्षांच्या पार्टा, स्वागत कार्यक्रम आदींवरही प्रचंड बंधने घातीला आहेत. नियम, अटी आणि शर्थीही ठेवल्या आहेत. या पार्श्वभूमीवर एल्गार परिषद घेण्यास माजी न्यायाधिश कोळसे पाटील यांना परवानगी मिळते का? याबाबत उत्सुकता आहे.

प्राप्त माहिती अशी की, माजी न्यायाधीश बी जी कोळसे पाटील यांचा एल्गार परिषद परवानगीबाबतचा अर्ज स्वारगेट पोलिसांनी वरिष्ठांकडे पाठवल्याचे समजते. एल्गार परिषदेला परवानगी द्यावी की नाही याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. (हेही वाचा, Elgar Parishad/Bhima Koregaon Case: वरावरा राव यांच्या प्रकृतीबाबतचा अहवाल सादर करा; मुंबई उच्च न्यायालयाचे नानावटी रुग्णालयाला निर्देश)

दरम्यान, एल्गार परिषदेबाबतची एक बैढक नुकतीच पुणे येथे पार पडली. या बैठकीची माहिती देताना परिषदेने म्हटले आहे की, कोरेगाव-भीमा (Koregaon-Bhima) येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी देशभरातील अनुयायी 1 जानेवारीस दरवर्षी येत असतात. याच निमित्ताने एल्गार परिषदेचे आयोजनही करण्यात आले आहे. यंदा ही परिषद गणेश कला-क्रीडा केंद्रात घेण्यात येणार असल्याचा निर्णय झाल्याचे परिषदेने म्हटले आहे. दरम्यान, पोलिसांच्या परवानगीवरच सर्व काही अवलंबून असल्याचे सध्या तरी सांगण्यात येत आहे.