पुणे (Pune) शहरातील सदाशिव पेठ (Sadashiv Peth) भागातील एका छोट्या भोजनालयाला शनिवारी (22 ऑक्टोबर) भीषण आग लागली. गॅस गळतीमुळे (Gas Leak) लागलेल्या यी आगीत सहा वर्षांची मुलगी मोठ्या प्रमाणावर होरपळली. तिला रुग्णालयात दाखल करणयात आले मात्र तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. सकाळी 10.50 च्या सुमारास सदाशिव पेठ भागातील बिर्याणी विक्रीच्या दुकानाला ही आग लागली.
उत्तर प्रदेशातील एक कुटुंब भोजनालयात काम करत होते आणि त्याच्याच वरच्या माचीवर तीन मुलांसह राहत होते. दरम्यानस, सकाळी 10.50 च्या सुमारास या भोजनालयाला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. अग्निशमन दलाच्या गाड्या आणि जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाचे एक पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना माचीवर एक मुलगी अडकल्याची माहिती मिळाली, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. मुलाची सुटका करून तिला रुग्णालयात हलवण्यात आले, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले, असे त्यांनी सांगितले. (हेही वाचा, Mumbra Fire: मुंब्य्रातील शीळ फाट्याजवळील खान कंपाऊंडच्या गोदामाला भीषण आग)
भोजनालयातील कामगारांच्या म्हणण्यानुसार, आग लागल्यावर जे लोक माचीवर होते ते खाली उतरण्यात यशस्वी झाले. मुलीच्या आईने तिच्या इतर दोन मुलांना उचलून खाली आणले. पण आगीमुळे मोठ्या प्रमाणावर धूर झाला होता. परिणामी तिला आपल्या तिसऱ्या अपत्यास (मुलीला) उचलता आले नाही.
आगीबद्दल अधिक माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, तळमजल्यावरील स्वयंपाकघरातील एलपीजी सिलेंडरमध्ये गळती झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा आम्हाला एका ठिकाणी तीन एलपीजी सिलिंडर दिसले आणि त्यापैकी एक लिक झाला होता. आम्ही ताबडतोब सर्व सिलिंडर बाहेर काढले, त्यामुळे पुढील अनर्थ टळला अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.