रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) लवकरच 20 रुपयांची नवीन नोट चलानात आणणार आहे. याबद्दल केंद्रीय बँकेने जाहीर केलेल्या एका डॉक्युमेंटमध्ये माहिती देण्यात आली आहे. बाजारात 200, 2000 रुपयांचे नोट आल्यानंतर 10, 50, 100 आणि 500 रुपयांची नवीन रुपातील नोट चलनात आणली होती.
नोव्हेंबर 2016 मध्ये नवीन रुपातील नोटांवर महात्मा गांधी यांचा फोटोसुद्धा दिसला होता. तर चलनात आलेल्या नवीन नोटांचा रंग व डिझाईन ही जुन्या नोटांपेक्षा वेगळ्या पद्धतीची आहे. तसेच 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा सोडल्यातर बाकी सर्व नोटांसाठी लीगल टेंडर ठेवण्यात आले आहे. (हेही वाचा- कर्जबुडव्यांना लगाम, एकाच क्लिकवर कर्जदाराची कुंडली; 'आरबीआय'चे डिजिटल पाऊल)
आरबीआयच्या माहितीनुसार, 31 मार्च 2016 पर्यंत 20 रुपयांच्या नोटांची संख्या 4.92 अरब एवढी होती. त्यामुळे मार्च 2018 पर्यंत 10 अरब झाली आहे.