पीएमसी बॅंकेतील 9 लाख ठेवीदारांना मिळणार दिलासा; आरबीआयने घेतला हा मोठा निर्णय
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

पीएमसी (PMC Bank) ठेवीदारांना (PMC Depositors) त्यांच्या हक्काचे पैसे परत मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. एवढेच नव्हे तर, पैसे बुडले या धक्क्याने काही ठेवीदारांनी त्यांचा जीव देखील गमवला आहे. यातच आरबीआयने (RBI) घेतलेल्या निर्णयाचा पीएमसी बॅंकेतील ठेवीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. आरबीआयने एचडीआयएलच्या (HDIL) मालमत्तेचा लिलाव करणार असून यातून तब्बल 9 लाख ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळणार आहेत. त्यानुसार आरबीआयने लिलाव प्रक्रियेसाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे येत्या काही आठवड्यात 9 लाख ठेवीदारांना याचा फायदा होणार आहे.

पीएमसीकडून एचडीआयएलला कर्ज देण्यात आले होते, मात्र एचडीआयएलने कर्जाची रक्कम वेळेत न भरल्याने पीएमसी बँक आणि बँकेतील ठेवीदार आता अडचणीत आले आहेत. बँकेला 4355.43 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याबद्दल हा एफआयआर नोंदविण्यात आला. अहवालानुसार पीएमसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस, अध्यक्ष वरम सिंग आणि अन्य अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. सध्या पीएमसी बॅंकेचे ठेवीदार संतापले असून त्यांनी अनेकदा आरबीआयच्या कार्यालयासमोर अंदोलन केली आहेत. त्यावेळी पीएमसी ठेवीदारांनी घाबरू नये, त्यांना पैसे परत मिळतील, असे अश्वासन आरबीआयने ठेवीदारांना दिले होते. यानुसार आरबीआयने एचडीएलची मालमत्तेचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून तब्बल 9 लाख ठेवीदारांना याचा फायदा होणार आहे. हे देखील वाचा- मुंबई: पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बॅंकेचे ठेवीदार संतप्त; रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या कार्यालयाबाहेर नोंदवला निषेध

पीएमसी बॅंकेतील ठेवीदार सध्या तणावात जगत आहे. आपल्या हक्काचे पैसे त्यांना परत मिळतील का नाही असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होत आहे. यातच आरबीआयने घेतलेल्या या निर्णयामुळे ठेवीदारांच्या मनगटात बळ आले आहे.