मुंबई: पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बॅंकेचे ठेवीदार संतप्त; रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या कार्यालयाबाहेर नोंदवला निषेध
PMC BANK Depositors (Photo Credits: Twitter/ ANI)

पीएमसी बॅंक घोटळा प्रकरणी (PMC Bank Crisis) बॅंकेतील ठेवीदारांनी (PMC Bank depositor) आज मुंबईतील (Mumbai) रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या (RBI) कार्यालयाबाहेर निषेध नोंदवला आहे. पीएमसी बॅंकेतील ठेवीदार गेल्या अनेक दिवसांपासून बॅंकेत ठेवलेली रक्कम परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. एवढेच नव्हे तर, हक्काचे पैसे बुडले या धक्क्याने काही ठेवीदारांना आपला जीवही गमवावा लागला आहे. याआधी रिझर्व्ह बॅंके ऑफ इंडियाने आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या पीएमसी ठेवीदारांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी आपण 30 ऑक्टोबरला निर्णय जाहीर करण्याचे आश्वासन दिले होते. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीनंतर ठेवीदारांचे अडकलेले पैसे मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारशी बोलणार, असा दावा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. मात्र, ठेवीदारांना कोणाताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी आरबीयच्या कार्यलयाबाहेर निषेध नोंदवला आहे.

पीएमसीकडून एचडीआयएलला कर्ज देण्यात आले होते, मात्र एचडीआयएलने कर्जाची रक्कम वेळेत न भरल्याने पीएमसी बँक आणि बँकेतील खातेदार आता अडचणीत आले आहेत. बँकेला 4355.43 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याबद्दल हा एफआयआर नोंदविण्यात आला. अहवालानुसार पीएमसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक (आता निलंबित) जॉय थॉमस, अध्यक्ष वरम सिंग आणि अन्य अधिकाऱ्यांची नावे आहेत. हे देखील वाचा- PMC बँक घोटाळाप्रकरणी नवा धक्कादायक खुलासा, रेकॉर्डमधून 10.5 करोड गायब

गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेला आणि कित्येक खातेदारांचा जीव टांगणीला लावलेल्या पीएमसी बँके बाबतचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया येत्या 30 ऑक्टोबरला जाहीर करण्याची शक्यता आहे. आरबीआयने आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या पीएमसी ठेवीदारांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. यावेळी त्यांनी आपण 30 ऑक्टोबरला निर्णय जाहीर करण्याचे आश्वासन दिले होते.