पंजाब अॅन्ड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक (PMC) घोटाळाप्रकरणी अंतर्गत तपास पथकाने एक धक्कादायक खुलासा केला आहे. पथकाने असे सांगितले आहे की, बँक रेकॉर्डमधील एकूण 10.5 करोड रुपयांची रोकड गायब आहे. तपास पथकाला एचडीआयएल (HDIL) आणि त्यासंबंधित कंपन्यांच्या द्वारे जारी केलेले चेक मिळाले आहेत. चेक बँकेत जमा न करताही त्यांना पैसे देण्यात आले होते. त्याचसोबत पीएमसी हा घोटाळा 4,335 करोडांचा नाही तर 6500 करोड रुपयांपेक्षा अधिक आहे.
तपास पथकाला जे चेक मिळाले आहेत ते 10 करोड रुपयांपेक्षा अधिक आहेत. तर बाकीच्या 50-55 लाख रुपयांचा कोणताही हिशोब नाही आहे. यापूर्वी बँक अधिकाऱ्यांनी 4,335 करोड रुपयांचा घोटाळा केल्याचे सांगण्यात येत होते. मात्र 6,500 रुपयांपेक्षा अधिक असल्याची माहिती समोर आली आहे. तर आरबीआय द्वारा नियुक्ती करण्यात आलेल्या तपास पथकाकडून याबाबत अधिक माहिती मिळत आहे का याचा शोध घेतला जात आहे.(PMC Bank Crisis: पीएमसी बॅंकेचे माजी संचालक जॉय थॉमस, सुरजित अरोरा यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ)
तपासात असे उघड झाले आहे की, एचडीआयएल आणि ग्रुप कंपन्यांना पैसे हवे होते. पहिल्या दोन वर्षात बँकेचे माजी संचालक जॉय थॉमस यांना चेक पाठवले होते. यावर त्यांना कॅश देण्यात आली परंतु चेक बँकेत जमा केले नाही. बँकेच्या रेकॉर्ड बुकमध्ये याबबात एकही एन्ट्री करण्यात आलेली नाही. थॉमस यांनी 50-55 लाख रुपये स्वत:जवळ ठेवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तर आरबीआयने लावलेल्या आर्थिक बंधनांनंतर पीएमसी बॅंकेचे खातेदार अडचणीत आले आहेत. खात्यातील रक्कम काढण्याची कमाल मर्यादा सध्या 40,000 इतकी आहे. तसेच कर्ज आणि इतर व्यवहारांवरही बंधनं आहेत.