रिलायंस रिटेल वेंचर (Reliance Retail Ventures Limited) ने आज (7 ऑक्टोबर) 7-Eleven, Inc. (SEI) सोबत करार झाला असून मास्टर फ्रांईचायसीस अॅग्रिमेंट अंतर्गत त्यांची आऊटलेट्स भारतामध्ये सुरू करण्याचा निर्णय झाल्याचं म्हटलं आहे. भारतातलं पहिलं 7-Eleven store येत्या 9 ऑक्टोबरला मुंबई मध्ये अंधेरी पूर्व (Andheri East) भागात सुरू होणार आहे.
7-Eleven स्टोअर्स हे ब्रेव्हरेजेस, स्नॅक आणि लोकल टेस्टचे पदार्थ देण्यासाठी प्रसिद्ध आहे. भारतामध्ये या नव्या चेन द्वारा स्थानिकांना रोजगार मिळवून देण्यास हातभार लागणार आहे. देशात सोयीस्कर पदार्थांची इकोसिस्टम तयार करण्यासही मदत होणार असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान फ्युचर रिटेल सध्या अशा आर्थिक अवस्थेमध्ये नाहीत की ते देशात 7-Eleven चे स्टोअर उघडून त्यांना चालवू शकतील. त्यामुळे त्यांनी परस्पर सहमतीने त्यांच्यातील करार रद्द केला आहे. नक्की वाचा: 6 फूटी Monitor Lizard जेव्हा Thailand च्या 7-Eleven स्टोअर मध्ये वस्तूंवरून झपझप चढते; सोशल मीडीयात झपाट्याने वायरल होतोय हा स्तब्ध करणारा व्हिडीओ (watch Video).
ANI Tweet
Reliance Retail has entered into a franchise agreement with 7-Eleven, for the launch of 7-Eleven convenience
stores in India. The first 7-Eleven store will open on October 9 in Andheri East, Mumbai: Reliance Retail
— ANI (@ANI) October 7, 2021
Reliance Retail Ventures Limited च्या ईशा अंबानी यांनी दिलेल्या माहितीमध्ये 7-Eleven हा रिटेल लॅन्डस्केप मध्ये आयकॉनिक ग्लोबल ब्रॅंड असल्याचं म्हटलं आहे. SEI द्वारा आता भारतीय ग्राहकांना अनेक पर्याय मिळणार आहे असं म्हटलं आहे.
SEI चा बेस हा अमेरिकेतील टेक्सास मध्ये Irving इथे आहे. त्यांच्याद्वारा फ्रॅंचायसिस आणि लायसंस स्टोअर 18 देशांमध्ये 77 हजारांहून अधिक लोकेशन वर आहे. नॉर्थ अमेरिकेमध्येच ती 16 हजार आहेत.