Image used for represenational purpose (File Photo)

अहमदनगर (Ahmednagar) मध्ये काल (30 नोव्हेंबर) रात्री एनसीपी कार्यकर्त्या आणि यशस्विनी महिला ब्रिगेड (Yashaswini Mahila Brigade) अध्यक्षा रेखा भाऊसाहेब जरे (Rekha Bhausaheb Jare) यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. 39 वर्षीय रेखा यांच्यावर पारनेर तालुक्यातील जतेगाव घाटात 2 मोटारस्वारांनी येऊन हल्ला केला. त्यामध्ये त्या जबर जखमी झाल्या. दरम्यान त्यांना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचार मिळण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेखा जरे या त्यांच्या कार मधून पुणे ते अहमदनगर असा प्रवास करत होत्या. त्यांच्यासोबत त्यांची आई, मुलगा आणि मित्रपरिवार होता. जतेगाव घाटात दोन मोटार बाईक स्वारांनी रस्त्याच्या मधोमध त्यांच्या गाडीपुढे बाईक आणून थांबवली. त्यांची रेखा जरे यांच्यासोबत शाब्दिक चकमक झाली. दरम्यान त्यांच्यापैकी एकाने चाकू काढून रेखा यांच्या मानेवर वार केला. त्या खाली कोसळल्या. त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले पण तेथे पोहचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. Amravati Murder: मुलगी आणि जावयाचे भांडण मिटवणे सासूच्या जीवावर बेतले; अमरावती येथील धक्कादायक घटना.

अहमदनगरच्या सुपा पोलिस स्टेशनमध्ये रेखा जरे यांच्या हत्येची तक्रार नोंदवण्यात आली आहे. तसेच अज्ञातांविरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून रेखा जरे यांच्यावर हल्ला करण्याचं नेमकं कारण काय आहे? याचा तपास सुरू आहे.

यशस्विनी महिला ब्रिगेड ही महिला सक्षमीकरणासाठी स्थापन करण्यात आलेली संघटना आहे. रेखा जरे पाटील त्याच्या अध्यक्षा होत्या. अहमदनगर जिल्ह्यात महिलांच्या सबलीकरणासाठी विविध उपक्रम या संघटनेच्या माध्यमातून त्या राबवले जातात. दरम्यान त्या एनसीपी मध्येही कार्यरत होत्या.