Maharashtra Assembly Election 2019: अबब ! राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची संपत्ती वाचून तुम्हीही व्हाल थक्क
Chhagan Bhujbal (Photo Credits: Facebook)

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे आगामी विधानसभा निवडणुकीत येवला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. भुजबळ यांनी आपला निवडणूक अर्ज दाखल करताना प्रतिज्ञापत्रातून आपली एकूण मालमत्ता जाहीर केली आहे.

छगन भुजबळ यांनी नमूद केलेल्या एकूण मालमत्तेवरून हे स्पष्ट होतं की ते कोट्याधीश आहेत. त्यांच्या मालकीची असणाऱ्या मालमत्तेची एकूण मूल्य ऐकून तुम्हालाही नक्कीच वाटेल आश्चर्य.

छगन भुजबळ यांच्या नावे एकूण 10 कोटी 37 लाख 94 हजार 639 रुपये इतकी मालमत्ता आहे. त्यातील बँक खात्यात असलेली रक्कम म्हणजे 46 लाख 20 हजार 787 रुपये इतकी आहे व 1 लाख 62 हजार 20 रुपये इतकी रक्कम त्यांनी शेअर्स मध्ये गुंतवली आहे. त्यांच्या नावावर असलेल्या दागिन्यांची किंमत आहे 21 लाख 6 हजार रुपये.

Maharashtra Assembly Election 2019: अभिजित बिचुकले यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नी तीनपट श्रीमंत; पहा किती आहे बिचुकले दांपत्याची एकूण संपत्ती

भुजबळ यांनी जाहीर केल्यानुसार त्यांच्याकडे एकच वाहन आहे ते म्हणजे ट्रॅक्टर. तसेच त्यांच्यावर 38 लाख 24 हजार 426 रुपये इतकं कर्ज आहे.

भुजबळ दांपत्याची एकूण संपत्ती पाहता त्यांच्याकडे एकूण 24 कोटींची संपत्ती आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांच्या विरोधात शिवसेनेचे संभाजी पवार यांनी आपला उमेदवार अर्ज भरला आहे.