Ratnagiri: संपूर्ण राज्यभरात सध्याच्या दिवसात रुबेला आणि गोवर लसीकरण मोहिम हाती घेण्यात आली आहे. मात्र या मोहिमेद्वारे मुलांना त्रास होण्याच्या घटना दिवसेंदिवस समोर येत आहेत.
रुबेला (Rubella) आणि गोवरच्या(Measles) उच्चाटनासाठी लसीकरण मोहिम ही राज्यभरात काही दिवसांपूर्वी चालू करण्यात आली आहे. तसेच बालकांना होणाऱ्या आजापासून दूर ठेवण्यासाठी या मोहिमेचा अवलंब केला जात आहे. मात्र गेले दोन-तीन दिवस या मोहिमेद्वारे मुलांना त्रास होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तर बुलढाणा आणि हिंगोली जिल्ह्यात लसीकरणामुळे मुलांना त्रास होण्यास सुरुवात झाली . तर आता रत्नागिरीतील न्यु इंग्लिश स्कुलमधील दहावीच्या विद्यार्थिनीला या लसीकरणानंतर तिची तब्येत बिघडली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या मुलीला गुरुवारी गोबर रुबेलाची लस टोचण्यात आली. त्यानंतर तिचा हाताला कंप फुटल्याने तिची प्रतिकृती आणखी बिघडली. या प्रकरणी तिला प्रथम कोल्हापूर येथे रुग्णालयात ठेवण्यात आले होते.मात्र या मुलीला आता मुंबईत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.