
कोल्हापूर (Kolhapur) यूथ डेव्हलपमेंट को-ऑपरेटिव्ह बँक (Youth Development Co-Operative Bank) लिमिटेड च्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI) जानेवारी 2019 पासून कर्जदारावरील सर्व निर्बंध मागे घेतले आहेत. बिघडलेल्या आर्थिक स्थितीच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने कोल्हापूरस्थित सहकारी बँकेवर अनेक निर्बंध घातले गेले होते. आयबीआयने 5 जानेवारी 2019 रोजी सहा महिन्यांसाठी यूथ डेव्हलपमेंट को-ऑपरेटिव्ह बँकेवर पैसे काढण्याच्या मर्यादेवर तसेच इतर गोष्टींवर निर्बंध लादले होते.
त्यानंतर 'सर्वसमावेशक दिशानिर्देश' ची वैधता वेळोवेळी वाढविण्यात आली होती. ती शेवटची 5 एप्रिल 2021 पर्यंत करण्यात आली होती. युवा विकास सहकारी बँक लिमिटेडची आर्थित स्थिती लक्षात घेऊन भारतीय रिझर्व्ह बँकेने जनहिताच्या दृष्टीने 05 एप्रिल, 2021 पासून बँकेवरील सर्वसमावेशक निर्देश मागे घेतले आहेत. (लाचा - Bank Holidays in April 2021: एप्रिल महिन्यात 'या' दिवशी बंद राहणार बँका, महत्वाची कामे लवकर उरकून घ्या)
आरबीआयने यूथ डेव्हलपमेंट को-ऑपरेटिव्ह बँकेवरील निर्बंध हटवल्यानंतर आता कर्जदारास कर्ज देण्यास किंवा नूतनीकरण करण्यासंदर्भात बँक निर्णय घेऊ शकते. आयबीआयच्या या निर्णयामुळे यूथ डेव्हलपमेंट को-ऑपरेटिव्ह बँक ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी रिझर्व्ह बँकने नाशिकमधील इंडिपेंडेंस को-ऑपरेटिव्ह बँक (Independence Co-operative Bank) मधून पैसे काढण्यास बंदी घातली होती. आरबीआयने इंडिपेंडेंस को-ऑपरेटिव्ह बँकेमधून पैसे काढण्यास सहा महिन्यांसाठी निर्बंध घातले आहेत.