शिवसना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांसाठी राजकीयदृष्ट्या सध्या अत्यंत संघर्षाचा काळ आहे. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड केले आणि 40 आमदार घेऊन ते बाजूला झाले. शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का मनाला जात आहे. अशा वेळी ठाकरे कुटुंबातील सदस्यही मोठ्या हिमतीने मैदानात उतरताना दिसत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचा यांचाही यात समावेश आहे. रश्मी ठाकरे आज ठाणे दौऱ्यावर आहेत. ठाणे येथील टेंभी नाका येथील देवीचे दर्शन घेण्यासाठी त्या उपस्थिती दर्शवणार असल्याचे समजते. त्यांच्या दौऱ्याला कसा प्रतिसाद मिळतो याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, शिंदे गटाकडून त्यांच्या या दौऱ्यावर टीका करण्यात आली आहे.
ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. शिवसेना नेते दिवंगत आनंद दिघे यांच्यापासून ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. दरम्यान, दिघे यांच्या निधनानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे शिवसेनेचे नेतृत्व आले. त्यामुळे सहाजिकच एकनाथ शिंदे यांना ठाण्यातील शिवसेनेचा प्रमुख चेहरा म्हणून पाहिले जाऊ लागले. आता तेच एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाजूला झालेले दिसतात. त्यामुळे ठाण्यातील एक मोठा गट एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेला आहे. त्यामुळे आता शिंदे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाण्यात रश्मी ठाकरे येत आहेत म्हटल्यावर चर्चा तर होणारच. (हेही वाचा, Uddhav Thackeray vs Eknath Shinde: धनुष्यबाण कोणाचा? खरी शिवसेना कोणाची? उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे वाद निवडणूक आयोगाच्या कोर्टात)
रश्मी ठाकरे पहिल्यांदा मुंबादेवी येथे महालक्ष्मीचे दर्शन घेणार आहेत. या वेळी त्या काही महिला शिवसैनिकांच्या गाठीभेटी घेऊ शकतात. त्यानंतर त्या ठाण्याला जाणार आहेत. रश्मी ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अर्थात, रश्मी ठाकरे यांचा हा दौरा नवा नाही. पाठिमागील अनेक वर्षे त्या ठाणे येथील टेभी नाक्यावरील देवीच्या दर्शनासाठी येतात. त्यांच्या हस्ते देवीची आरतीही होते. यंदा मात्र, शिवसेनेतील अभूतपूर्व फुटीमुळे त्याकडे वेगल्या दृष्टीकोणातून पाहिले जात आहे. दरम्यान, आजच्या आरतीची वेळ शिंदे गटातील महिला नगरसेविकेने आरक्षीत केल्याचे समजते. त्यामुळे आजच्या दौऱ्यात काय घडते याबाबत उत्सुकताआहे.
ट्विट
अरेरे..मा.रश्मी वहिनी ठाण्याला जाणार आहेत म्हणून शिल्लक सेनेला असे msgs करुन मुंबई मधून महिला गोळा करुन गर्दी दाखवायचा केविलवाणा प्रयत्न करावा लागत आहे... pic.twitter.com/gd6iB4XEKz
— sheetal mhatre (@sheetalmhatre1) September 28, 2022
दुसऱ्या बाजूला शिंदे गटात गेलेल्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी रश्मी ठाकरे यांच्या दौऱ्यावरुन शिवसेनेला टोला लगावला आहे. शितल म्हात्रे यांनी एका व्हॉट्सअॅप ग्रुपवरील मेसेजचा स्क्रीनशॉट ट्विटरवर शेअर करत म्हटले आहे की, 'अरेरे..मा.रश्मी वहिनी ठाण्याला जाणार आहेत म्हणून शिल्लक सेनेला असे msgs करुन मुंबई मधून महिला गोळा करुन गर्दी दाखवायचा केविलवाणा प्रयत्न करावा लागत आहे.'