Jitendra Awhad (Photo Credit: Twitter)

राज्याचे गृहमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)  यांनी फोन टॅपिंग प्रकरणी केंद्रस्थानी असलेल्या रश्मी शुक्ला यांच्यावर पुन्हा एकदा आरोप केला आहे. तर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत त्यात असे म्हटले आहे की, अपक्ष आमदार राजेंद्र यड्रावकर यांनी भाजप सोबत राहवे यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांना धमकावल्याचा गंभीर आरोप केला आहे. तर आव्हाड यांनी ट्विट करत रश्मी शुक्ला यांच्यावर निशाणा सुद्धा साधला आहे.(विरोधकांना पहिल्या दिवसापासून आमचे सरकार पाडावे अशी इच्छा होती मात्र आम्हाला पूर्ण बहुमत आहे- उपमुख्यमंत्री अजित पवार)

आव्हाड यांनी ट्विट करत असे म्हटले आहे, शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र येड्रावकर यांनी महाविकास आघाडी मध्ये न जाता भाजपा बरोबर राहावं यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांची वैयक्तिक भेट घेतली, त्यांना फोन केले व त्यांच्यावर दबाव आणण्याचा देखील प्रयत्न केला होता. अजून काय पुरावे हवेत असा सवाल सुद्धा आव्हाड यांनी येथे उपस्थितीत केला आहे.(Parambir Singh Letter Bomb: गृहमंत्री अनिल देशमुख यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र, वसूली बद्दल लावण्यात आलेल्या आरोपांचा तपास करण्याची मागणी)

Tweet:

दरम्यान, याआधी आव्हाड यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर हल्लाबोल करत असे म्हटले होते की, त्यांनी आपल्यावर कारवाई होऊ नये म्हमून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुख यांच्या समोर रडल्याचा दावा केला. तसेच महाविकास आघाडीने त्यांना माफ ही केल्याचे त्यांनी सांगितले. परंतु त्यांनी काही दिवसांनी बदनामी करण्याचा प्रयत्न करतील असे वाटले नव्हते. तर सध्या फोन टॅपिंगच्या प्रकरणी रश्मी शुल्का यांच्यावर टीका केली जात आहे.