Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

पालघर (Palghar) जिल्ह्यात अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरे चारण्यासाठी गेलेल्या 16 वर्षीय अल्पवयीन आदिवासी मुलीवर बलात्कार (Rape) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडितेच्या कुटुंबियांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पालघर जिल्ह्यातील मनोरमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण मनोरमध्ये खळबळ माजली आहे.

प्राप्त माहितीनुसार, बुधवारी म्हणजेच 21 ऑक्टोबरला ही घटना घडली. पीडिता शेतात गुरे चारण्यासाठी गेली होती. यावेळी तिला एका अनोळखी व्यक्तीने फरफटत नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर पीडितेने आणि तिच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या नराधमाचा शोध घेत आहेत. (हेही वाचा - Ludhiana Rape: मित्राचा वाढदिवस साजरा करून घरी परतणाऱ्या तरूणीवर चालत्या कारमध्ये बलात्कार; लुधियाना शहरातील घटना)

दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी बलात्कारच्या घटना समोर येत आहेत. दरम्यान, गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे दलित मुलीवर सामूहिक बलात्कार आणि हत्या झाल्याची घटना घडली होती. सध्या या प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरू आहे. या प्रकरणानंतर संपूर्ण देशात संताप व्यक्त करण्यात आला.

विशेष म्हणजे ही घटना ताजी असतानाचं हाथरमध्ये शनिवारी पुन्हा एकदा 4 वर्षीय मुलीवर दोन अल्पवयीन मुलांनी बलात्कार केला. या प्रकरणामुळे हाथरस पुन्हा हादरले. या दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच या प्रकरणी स्थानिक हाथरस जंक्शन पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.