ग्लोबल टीचर पुरस्कार जिंकणार्‍या रणजीतसिंह डिसले यांच्यावर अजित पवार, तुकाराम मुंढे ते राज ठाकरे यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव; पहा ट्वीट्स
रणजीतसिंह डिसले । Photo Credits: Twitter/ Supriya Sule

सोलापूरच्या जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजीतसिंह डिसले (Ranjitsinh Disale) यांच्या रूपाने पहिल्यांदाच एका भारतीयाला ग्लोबल टीचर पुरस्कार (Global Teacher Award) देऊन गौरवण्यात आले आहे. काल या पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर रणजितसिंह यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यापासून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule)  यांच्याकडून ट्वीटरच्या माध्यमातून अभिनंदनपर ट्वीट्स शेअर केली जात आहे.

दरम्यान ग्लोबल टीचर पुरस्कार हा युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्याकडून दिला जातो. QR कोड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्र सह देशातील शिक्षण क्षेत्रात क्रांती करणार्‍या रणजीतसिंह डिसले यांच्या कामांची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. 2013-14 मध्ये राज्यातील शाळांमध्ये ई-लर्निंगला प्रोत्साहन मिळावे, यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमार्फत शिक्षकांना देण्यात आलेल्या पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्येसुद्धा रणजीतसिंह डिसले त्यांचा समावेश होता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज ठाकरे

अजित पवार

देवेंद्र फडणवीस

सुप्रिया सुळे

तुकाराम मुंढे

जगभरातील 140 देशातील 12 हजारांहून अधिक शिक्षकांमधून अंतिम विजेता म्हणून रणजीतसिंह डिसले यांची निवड झाली आहे. त्यांना 7 कोटीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, रणजीतसिंह यांनी पुरस्काराच्या एकूण रकमेच्या निम्मी रक्कम अंतिम फेरीतील 9 शिक्षकांना देण्याचे जाहीर केले आहे. यामुळे विविध नऊ देशांतील हजारो शालेय विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाऊ शकते असे ते म्हणाले आहेत.