आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील नागरिकांसाठी, पर्यटकांसाठी पेंग्विन हा पक्षी मुंबईत आणण्यात मोलाची भूमिका बजावली. मात्र, याच पेंग्विनवरील खर्चावरु त्यांच्यावर सातत्याने टीका होत असते. राणीच्या बागेतील अर्थात वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणीसंग्रहालयातील पेंग्विन पक्षांच्या देखभालीचा खर्च यंदा आणखी वाढला आहे. पेंग्विनच्या वाढत्या संख्येबरोबरच खर्चही वाढला असून यंदा तब्बल 20 कोटी अंदाजित खर्चासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. (हेही वाचा - Raigad News: रायगडच्या सावित्री नदीमध्ये पोहायला गेलेल्या तीन जणांचा बुडून मृत्यू)
. त्यामधील एका पेंग्विनचा त्याचवेळी मृत्यू झाला. त्यानंतर 7 पेंग्विन या कक्षात होते. मग या पेंग्विनच्या जोड्यांना पिल्ले झाली. पेंग्विनची संख्या गेल्या सहा वर्षात वाढून तब्बल 18 वर गेली आहे. यात दहा मादी आणि आठ नर यांचा समावेश आहे. पेंग्विनची संख्या वाढण्याबरोबरच पेंग्विनच्या देखभालीचा खर्चही यंदा वाढला आहे. प्राणीसंग्रहायल व्यवस्थापनाने पेंग्विनच्या देखभालीसाठी तीन वर्षांकरीता निविदा मागवल्या आहेत. तीन वर्षांसाठीचा अंदाजित खर्च 20 कोटी 17 लाखांवर आहे.
पेंग्विनची संख्या आणि देखभाल खर्च वाढलेला असला तरी पेंग्विनच्या आगमनानंतर प्राणीसंग्रहालयाचा महसूलही वाढला असल्याचा दावा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. 2013 मध्ये 12 कोटींचा महसूल जमा झाला तर 2024 मध्ये गेल्या आठ महिन्यात 5 कोटी 91 लाखांचा महसूल जमा झाला आहे. संपूर्ण राणीची बाग बघायला 100 रुपये तिकीट आहे, त्याचं उत्पन्न आता कोट्यावधी रुपयांच्या घरात गेलं आहे. त्या प्राणीसंग्रहालयाचं उत्पन्न हे तोट्यात होतं, त्या पेंग्विन्जमुळे ते फायद्यात गेलं