महाराष्ट्रात सध्या नागपूर मध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना आज विधानपरिषद सभापती (l Chairperson) पदी भाजपाच्या राम शिंदे (Ram Shinde) यांची निवड झाली आहे. ही निवड आवाजी मतदानाने बिनविरोध झाली आहे. दरम्यान रामराजे निंबाळकर यांच्यानंतर 2022 पासून रिक्त असलेल्या या पदावर आता राम शिंदे यांची नेमणूक झाली आहे. राम शिंदे यांच्या बिनविरोध निवडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
राम शिंदे यांची राजकीय कारकीर्द
प्राध्यापक राम शिंदे हे आहिल्यानगर जिल्ह्यामधील कर्जत-जामखेडचे आहेत. देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून राम शिंदे यांनी काम केले होते. 2019 साली रोहित पवार यांनी त्यांचा विधानसभा निवडणूकीमध्ये पराभव केला. त्यानंतर त्यांना आता भाजपाने विधानपरिषदेवर संधी दिली. 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतही रोहित पवार यांनी त्यांचा पराभव केला. आता भाजपाने राम शिंदे यांना विधान परिषदेचे सभापदी पद दिले आहे.
राम शिंदे यांची विधानपरिषद सभापती म्हणून निवड
विधानपरिषदेचे सभापती म्हणून प्रा. #राम_शिंदे यांची एकमतानं निवड.#WinterSession2024 #Maharashtra #Nagpur #LegislativeCouncil @RamShindeMLA @neelamgorhe https://t.co/ULlfzEdcVq pic.twitter.com/niZ6pl4eOi
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) December 19, 2024
भाजपाचे राहुल नार्वेकर यांना विधानसभेचं अध्यक्षपद आणि त्यापाठोपाठ विधानपरिषदेच्या सभापती पदी देखील भाजपाने आपला चेहरा दिला आहे. दरम्यान 20 डिसेंबर पर्यंत नागपूर मध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू राहणार आहे. सरकार मध्ये 39 मंत्र्यांचा शपथविधी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झाला आहे त्यामुळे आता खातेवाटपाची उत्सुकता आहे.