Ajit Pawar | X

विधानसभा निवडणूक निकाल ताजा असतानाच अजित पवार (Ajit Pawar) आणि रोहीत पवार (Rohit Pawar) या काका पुतण्यांच्या भेटीचा एक व्हिडिओ जोरदार चर्चेत आहे. या भेटीत दोघांधील संवादही ऐकायला मिळत आहे. ज्यामुळे कर्जत जामखेड (Karjat Jamkhed Assembly Constituency) येथील भाजपचे पराभूत उमेदवार राम शिंदे ( Ram Shinde) यांनी मोठा आरोप केला आहे. ज्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु झाली आहे. तसेच, अजित पवार आणि रोहित पवार यांच्यात कथीत छुपी युती असल्याचेही बोलले जाऊ लागल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

काका पुतण्याचा संवाद, राजकीय वर्तुळात चर्चा

एका व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, अजित पवार आणि रोहित पवार आमनेसामने येत आहेत. या वेळी दोघांनीही परस्परांचे अभिनंदन केले. पण अजित पवार यांनी आपल्या ज्येष्ठत्वाचा फायदा घेत अचूक टायमींग साधले. रोहित पवार समोर दिसताच अजित पवार म्हणतात की, 'ये ये.. पाया पड.. पाया पड.. काकांच्या. आशीर्वाद घे. दाद्या थोडक्यात वाचलास. जर मी सभा घेतली असती तर काय झालं असतं?' या संवादानंतर उपस्थितांमध्येही खसखस पिकली.

राम शिंदे यांचा मोठा आरोप

दरम्यान, दोन्ही नेत्यांमधला संवाद प्रसारमाध्यमांतून पुढे येताच भाजपचे पराभूत उमेदवार राम शिंदे यांनी नाराजी व्यक्त करत जोरदार टीका केली आहे. त्यांनी आरोप केला आहे की, माझा पराभव म्हणजे एका कटाचा भाग आहे. या आरोपाला पार्श्वभूमी अशी की, कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात राम शिंदे हे भाजपच्या तिकीटावर मैदानात होते तर रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून. दोन्ही उमेदवार एकाच मतदारसंघात प्रतिस्पर्धी होते. त्यात अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजप महायुतीत एकत्र आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्या पक्षाने भाजपस सहकार्य करणे स्वाभावीक आहे. मात्र, दोन्ही पवारांचा संवाद पाहता त्यांनी संगनमताने एकमेकांस छुपी मदत केल्याचा संदेश जातो. ज्यावरच शिंदे यांनी बोट ठेवल्याचे दिसते.

ढाण्या थोडक्यात वाचला

रोहित पवार थोडक्यात बचावले, शिंदे नसटते हारले

कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवार यांनी 1 लाख 27 हजार 676 तर राम शिंदे यांना राम शिंदे यांना 1 लाख, 26 हजार 433 मते मिळाली. शिंदे यांच्यापेक्षा 1243 मते अधिक घेत पवार आघाडीवर राहिले. ज्यामुळे त्यांचा विजय झाला. उल्लेखनिय असे की, अपक्ष रोहित चंद्रकांत पवार यांनी तब्बल 3489 मते घेतली. नामसाधर्म्याचा मोटाच फटका विजयी पवारांना बसल्याचे पाहायला मिळाले. शिवाय नोटाला 601 मते मिळाली.