
पॉर्नोग्राफी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) याच्या अडचणींमध्ये अधिक वाढ होताना दिसून येत आहे. अशातच आता त्याच्यावर आणखी एक मोठा आरोप लावण्यात आला आहे. भाजप नेते राम कदम यांनी राज कुंद्रावर आरोप लावत असा दावा केला आहे की, अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राजने ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून 300 कोटी रुपयाांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी भाजप नेत्याने त्याच्या विरोधातील काही कागदपत्र सुद्धा दाखवली आहेत. त्यांनी असे ही म्हटले की, राजने गेमिंच्या प्रचारासाठी आपली पत्नी शिल्पा हिच्या फोटोचा सुद्धा वापर केला होता. दुसऱ्या बाजूला गुन्हे शाखेच्या सुत्रांनुसार भाजपच्या नेत्याने केलेल्या या गंभीर आरोपानंतर या प्रकरणी सुद्धा तपास केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राम कदम यांनी दावा केला की, राज कुंद्राने त्याची कंपनी वियान इंडस्ट्रिजने GOD नावाचा एक गेम लॉन्च केला होता. या गेमच्या माध्यमातून तरुणांकडून जवळजवळ 300 कोटी रुपये लुटले गेले आहेत. ऐवढेच नव्हे तर गेम ऑफ डोट्स प्रचारासाठी शिल्पा शेट्टीच्या फोटोचा वापर केला गेला. या आरोपांवर वियान इंडस्ट्रीजने असे म्हटले की, ऑनलाईन गेम लॉन्चिंगसाठी सर्व कायद्यांचे पालन करण्यात आले होते. तो पूर्णपणे सुप्रीम कोर्टाच्या निर्देशनानुसार आहे.('माध्यमांनी पोलिसांच्या माहितीच्या आधारे बातम्या दिल्या, तर ती बदनामी कशी ठरेल?' हायकोर्टाने Shilpa Shetty ला फटकारले)
गेमच्या माध्यमातून बक्षिस देण्याच्या नावाखाली तरुणांकडून ही रक्कम उकळली गेली आहे. त्याचसोबत गेम डिस्ट्रिब्युशनच्या नावे लोकांकडून 15-20 लाख रुपये घेण्यात आले. जेव्हा लोकांना आपली फसवणूक झाल्याचे कळले तेव्हा ते त्याच्याकडे गेले. तेव्हा त्यांना मारहाण केली गेली. कदम यांनी असा ही आरोप लावला आहे की, राज याने लोकल पोलिसांच्या मदतीने लोकांचा गप्प बसण्यासाठी मदत घेतली होती.